ST Bus : विठ्ठल भक्तांसाठी एसटीचा महाप्रसाद! प्रवासाची गैरसोयी होणार दूर, पुणे विभागातून 100 जादा बसेस धावणार
Last Updated:
Pune To Pandharpur: पंढरपूर यात्रेसाठी एसटीकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे विभागाने यात्रेकरूंना सोयीस्कर प्रवासासाठी 100 जादा बसेस सुरू केल्या आहेत. वल्लभनगर आगारातून ग्रुप बुकिंगची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
पिंपरी : पंढरपूरमध्ये होणाऱ्या भागवत एकादशी आणि कार्तिक पौर्णिमेनिमित्त एसटी महामंडळाने भाविकांकरिता खास व्यवस्था केली आहे. 2 नोव्हेंबरला भागवत एकादशी आणि नोव्हेंबर महिन्यातच कार्तिक पौर्णिमा साजरी होणार आहे. त्यामुळे पुणे विभागाने तिथे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मोठे नियोजन केलं आहे.
पुणे विभागाकडून पंढरपूर यात्रेसाठी विशेष तयारी
पंढरपूरला जाणाऱ्या आणि तिथून परतणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे विभागाने तब्बल 100 जादा बसेस रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त बसेस विविध बसस्थानकांवरून सुटणार असून प्रवाशांना वेळेवर आणि सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी करण्यात आल्या आहेत.
वल्लभनगर आगारातही या बसेसाठी ग्रुप बुकिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी ही सुविधा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. वल्लभनगरसह इतर मुख्य आगारांवरही बुकिंग सुरू करण्यात आले आहे.
advertisement
एसटी महामंडळाने सुरू केले 'ग्रुप बुकिंग'
पुणे विभागाचे विभाग नियंत्रक सिया यांनी सांगितले की, आमच्या आगारांतर्गत पंढरपूरची वाहतूक सेवा 7 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात्रेच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने अतिरिक्त बसेसची सोय करण्यात आली आहे. मुख्य बसस्थानकावरून किमान 40 प्रवाशांचा गट तयार करून ग्रुप बुकिंग केल्यास त्या गटासाठी स्वतंत्र जादा बस पंढरपूरकडे पाठवली जाईल.
advertisement
एसटी प्रशासनाने प्रवाशांना आगाऊ बुकिंग करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि अडचणी टाळता येतील. तसेच सर्व बसस्थानकांवर तिकीट बुकिंग काउंटर वाढवण्यात आले असूनप्रवाशांना प्रवासादरम्यान मदत करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात्रेकरूंना सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेवर प्रवासाचा आनंद मिळावा हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 01, 2025 8:16 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
ST Bus : विठ्ठल भक्तांसाठी एसटीचा महाप्रसाद! प्रवासाची गैरसोयी होणार दूर, पुणे विभागातून 100 जादा बसेस धावणार







