Mumbai Pune Missing Link: पुणे- मुंबई एक्स्प्रेसवरुन जाता येणार सुसाट, प्रवास होणार 30 मिनिटांनी कमी
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
'मुंबई- पुणे एक्सप्रेस वे' वरील प्रवास आता आणखीनच सुसाट होतोय. मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील अनेक दिवसांपासून रखडलेल्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 'मुंबई- पुणे एक्सप्रेस वे' वरील प्रवास आता आणखीनच सुसाट होतोय. मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील अनेक दिवसांपासून रखडलेल्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणेकरांचा प्रवास आणखीनच सुसाट होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या या प्रोजेक्टचे काम आता लवकरच पूर्णत्वास येणार आहे.
मुंबई- पुणे प्रवास आता आणखीनच जलद होणार आहे. प्रवाशांच्या वेळेमध्ये आणखीनच कपात होणार आहे. 'मिसिंग लिंक' प्रकल्पामुळे मुंबई- पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ जवळपास 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे. प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लोणावळा- खंडाळा विभागातील टायगर व्हॅलीजवळ उभारण्यात आलेला 650 मीटर लांबीचा केबल- स्टेड पूल आहे. ज्याचं जवळपास पूर्णत्वास आलेले आहे. या पूलामुळे मुंबई- पुणे प्रवास आणखीनच कमी होणार आहे.
advertisement
650 मीटर 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा पूल जमिनीपासून सुमारे 100 मीटर उंचीवर आहे. हा नवीन मार्ग सुरू झाल्यावर द्रुतगती मार्गावरील घाट सेक्शन टाळता येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तब्बल 25 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार असल्यामुळे प्रवाशांसाठी अनेकदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल, हे नक्की. १३.३ किलोमीटर लांबीचा मार्ग प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रकल्पाच काम शेवटच्या टप्प्यात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 26, 2025 6:14 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Mumbai Pune Missing Link: पुणे- मुंबई एक्स्प्रेसवरुन जाता येणार सुसाट, प्रवास होणार 30 मिनिटांनी कमी


