ट्रम्प यांच्या Next Targetचे नाव समोर आले, सत्ता उलथवण्याचे 'काऊंटडाऊन' सुरू; एका पोस्टने जगभरात खळबळ
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Donald Trump Next Target: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मदुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला मोर्चा क्युबाकडे वळवला असून, तिथे सत्तापालट करण्यासाठी हालचाली तीव्र केल्या आहेत.
वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये सत्ता बदल केल्यानंतर आता ते ग्रीनलँडकडे वळले आहेत. ट्रम्प यांची ही लिस्ट या दोन देशापुरती मर्यादीत नाही. या यादीत आता आणखी एक धक्कादायक नाव समोर आल्याने जगभरातील अनेक देशांना शॉक बसला आहे.
ट्रम्प आता क्युबामधील कम्युनिस्ट राजवट बदलण्याच्या (Regime Change) तयारीत असल्याचे वृत्त आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांना सत्तेवरून हटवण्यात यश मिळाल्यानंतर आणि ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांनंतर, ट्रम्प प्रशासनाने आता आपला मोर्चा क्युबाकडे वळवला आहे. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या वृत्तानुसार या वर्षाच्या अखेरीस क्युबातील कम्युनिस्ट सरकारला बाहेर काढण्यासाठी ट्रम्प प्रशासन क्युबा सरकारमधीलच काही 'इनसायडर्स' (अंतर्गत लोक) शोधत आहे, जे अमेरिकेला या कामात मदत करू शकतील.
advertisement
क्युबाची ढासळती स्थिती
क्युबावर गेल्या सात दशकांपासून कम्युनिस्टांची पकड आहे, मात्र सध्या राष्ट्राध्यक्ष मिगुएल डायझ-कॅनेल यांची सत्ता पूर्वी कधीही नव्हती इतकी कमकुवत झाली आहे. व्हेनेझुएलाचे हुकूमशहा मदुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर क्युबाचा मुख्य आर्थिक आधार तुटला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते क्युबाची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे.
क्युबा-व्हेनेझुएला संबंध: क्युबा दीर्घकाळापासून व्हेनेझुएलाला वैद्यकीय, सुरक्षा आणि गुप्तचर सेवा पुरवत आला आहे. त्या बदल्यात त्यांना सवलतीच्या दरात तेल मिळत होते. मदुरो यांना पकडण्यासाठी अमेरिकेने केलेल्या मोहिमेत मदुरोच्या रक्षणासाठी तैनात असलेले जवळपास 36 क्युबन एजंट मारले गेले. त्यांचे मृतदेह गेल्या आठवड्यात क्युबात परत आणण्यात आले.
advertisement
आर्थिक आणि मानवी संकट
इंटेलिजन्स अहवालानुसार क्युबामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून येत्या काही आठवड्यांत देशातील इंधन संपण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासन व्हेनेझुएलातून क्युबाकडे जाणारा तेलाचा पुरवठा पूर्णपणे रोखून या राजवटीला अधिक कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय क्युबाच्या विदेशी वैद्यकीय मोहिमांवरही (जे क्युबाच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे) बंदी घालण्याचे अमेरिकेचे नियोजन आहे.
advertisement
ट्रम्प प्रशासनाची योजना
व्हेनेझुएलामध्ये ज्या पद्धतीने अमेरिकेने मदुरो यांना पकडले आणि तिथल्या हंगामी सरकारकडून सवलती मिळवल्या, तोच 'ब्लूप्रिंट' (आराखडा) क्युबासाठी वापरला जाणार आहे.
अंतर्गत गुप्तचर मदत: अमेरिकन अधिकारी मियामी आणि वॉशिंग्टनमध्ये क्युबन निर्वासितांशी चर्चा करून सरकारमधील अशा व्यक्तीला शोधत आहेत जो अमेरिकेसोबत हातमिळवणी करेल.
कठोर इशारा: ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करत म्हटले आहे की, वेळ निघून जाण्यापूर्वी त्यांनी करार करावा, हे त्यांच्या हिताचे आहे. यापुढे क्युबाला कोणतेही तेल किंवा पैसा मिळणार नाही.
advertisement
स्टेट डिपार्टमेंटचे अधिकारी जेरेमी लेविन यांनी स्पष्ट केले की, व्हेनेझुएलातील घटनेने जगातील प्रत्येक हुकूमशहाला हा संदेश दिला पाहिजे की, तुम्ही ट्रम्प यांच्याशी खेळ करू नका.
अमेरिकेच्या योजनेतील अडचणी
क्युबातील कम्युनिस्ट राजवट संपवण्याची अनेक देशांची इच्छा असली तरी, हे काम व्हेनेझुएला इतके सोपे नाही.
1. विरोधकांचा अभाव: व्हेनेझुएलामध्ये विरोधी पक्ष आणि लोकशाहीसाठी आंदोलने होत होती. पण क्युबा हा एकपक्षीय स्टॅलिनिस्ट देश आहे, जिथे राजकीय विरोधावर बंदी आहे.
advertisement
2. प्रबळ पकड: 7 दशकांपासून क्युबाने आपल्या राजकीय रचनेत बदल करण्यास नकार दिला आहे. माजी ओबामा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मते, क्युबा सरकारमधील कोणालाही फोडून अमेरिकेच्या बाजूला वळवणे अत्यंत कठीण आहे.
मदतीचा हात की राजकीय खेळी?
दरम्यान अमेरिकेने चक्रीवादळ 'मेलिसा'मुळे बाधित झालेल्या क्युबन लोकांसाठी 3 दशलक्ष डॉलर्सची मदत पाठवली आहे. मात्र क्युबाचे परराष्ट्र मंत्री ब्रुनो रॉड्रिग्ज यांनी यावर टीका करत म्हटले की, अमेरिका मानवतावादी मुद्द्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी आणि फेरफार करण्यासाठी करत आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 8:39 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
ट्रम्प यांच्या Next Targetचे नाव समोर आले, सत्ता उलथवण्याचे 'काऊंटडाऊन' सुरू; एका पोस्टने जगभरात खळबळ








