माझा पोरगा उद्याच पोलिसांच्या समोर येईल, महाड राडा प्रकरणात कोर्टाने झापल्यानंतर मंत्री गोगावले नरमले

Last Updated:

भरत गोगावले यांचा मुलगा विकास, पुतण्या महेश गोगावले यांच्यासह माजी आमदार माणिक जगताप, श्रीयांश जगताप यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत गोगावले
भरत गोगावले
मुंबई : माझ्या मुलाशी संपर्क साधून तो उद्या पोलिसांसमोर आत्मसमर्पण करेल, असे मंत्री भरत गोगावले यांनी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले. त्याआधी महाड राडा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांना कठोर शब्दात झापले होते.
निवडणुकीदरम्यान महाडमधल्या राड्यावरून पोलीस अजूनही मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाला अटक करू शकले नाहीत, यावरून मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर तसेच गृहमंत्री तथा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भरत गोगावले यांचा मुलगा विकास, पुतण्या महेश गोगावले यांच्यासह माजी आमदार माणिक जगताप, श्रीयांश जगताप यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
आजच्या दिवसभरात मुंबई उच्च न्यायालयात दोन वेळा सुनावणी झाली. आरोपींना अटक करण्यात आलेल्या अपयशावर मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. माननीय मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत की त्यांना त्याबाबत काहीही करता येत नाही, असा बोचरा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला. त्यानंतर मात्र
मंत्री भरत गोगावले यांच्याशी संपर्क करण्यात आला असून त्यांनी मुलाशी संपर्क साधण्याच आश्वास दिल असून त्यानंतर तो आत्मसमर्पण करेल माझ्या मुलाशी संपर्क साधून तो उद्या पोलिसांसमोर आत्मसमर्पण करेल, असे गोगावले यांनी न्यायालयाला आश्वस्त केले. उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.
advertisement

महाडमध्ये नेमकं काय घडलं होतं?

महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. नवे नगर परिसरात मतदान सुरू असताना अचानक शिवसेना आणि राष्ट्रावादीतील कार्यकर्त्यांच्या गटात हाणामारी झाली होती. माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप गटाचे नेते सुशांत जाबरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या राड्याप्रकरणी गोगावले यांच्या मुलावर, पुतण्यावर गुन्हा दाखल झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत, मात्र विकास गोगावले अजूनही पोलिसांच्या हाताला लागलेला नाही.
advertisement

महाराष्ट्रातील कायद्याचे राज्य प्रतिकूलरित्या प्रभावित, न्यायालयाचे गंभीर निरीक्षण

आपला मुलगा फरार बसून आपल्या संपर्कात असल्याचे भरत गोगवलेंचे वक्तव्य देखील मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आले. सरकार कोणालाही २४ तासात अटक करू शकते जेव्हा त्यांना अटक करायची नसते तेव्हा ते प्रतिज्ञापत्र सादर करतात. महाराष्ट्रातील कायद्याचे राज्य प्रतिकूलरित्या प्रभावित झाल्याचे गंभीर निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. राज्य सरकारने संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माझा पोरगा उद्याच पोलिसांच्या समोर येईल, महाड राडा प्रकरणात कोर्टाने झापल्यानंतर मंत्री गोगावले नरमले
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement