Sharad Mohol murder : शरद मोहोळचा गेम वाजवणाऱ्या मुन्ना पोळेकरचा VIDEO व्हायरल, KGF स्टाईल केलं होतं प्लॅनिंग!
- Published by:sachin Salve
Last Updated:
सोबत राहूनच त्याने शरद मोहोळच्या हालचालींची माहिती मामा नामदेव कानगुडे याला दिली. आठवडाभरापूर्वी शरद मोहोळचा गेम करायचं निश्चित झालं.
पुणे : पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची भरदिवसा हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाची नवनवीन माहिती समोर येत आहे. ज्या मुन्ना पोळेकरने शरद मोहोळवर गोळीबार केला त्याचे व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये येरवड्याला जाणार असं पोळेकर म्हणत आहे. तसंच, हत्येसाठी जी गाडी वापरली तिचाही व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
नामदेव कानगुडे हा या हत्येचा खरा मास्टरमाईंड असून त्याने मोहोळच्या हत्येचा कट रचला. मुठा खोऱ्यातील गुन्हेगारी वर्चस्ववादातून शरद मोहोळ याची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मुन्ना पोळेकर याच्यासह दोन जणांना मोहोळच्या टोळीत महिनाभर आधी घुसवण्यात आलं, त्यानंतर ही हत्या करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून पोळेकर हा मोहोळच्या हत्येसाठी तयारी करत होता. जून महिन्यात त्याने हत्येसाठी जी कार वापरली होती ती खरेदी केली होती. एवढंच नाहीतर आपल्या साथीदारांसाठी येरवड्यात येणार असंही तो एका व्हिडीओमध्ये म्हणत आहे. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याचा हा व्हिडीओ जुना असला तरी त्याने बऱ्याच दिवसांपासून मनाशी पक्कं केलं होतं.
advertisement
advertisement
शरद मोहोळ आणि नामदेव कानगुडेमध्ये काय होता मॅटर?
गेल्या 15 वर्षांत शरद मोहोळने गुन्हेगारी जगतात नाव कमावल तसे शत्रू ही वाढवले. तो राहत असलेल्या कोथरूडच्या सुतारदरा परिसरात राहणाऱ्या नामदेव कानगुडेला त्याने सुतारदरा सोडायला भाग पाडलं. त्याच कानगुडेने ओळख असल्याचा फायदा घेत भाचा मुन्ना पोळेकर याला शरद मोहोळकडे टोळीत विश्वास संपादन करायला पाठवलं. 3 महिन्यापूर्वीच या हत्येसाठी मुन्ना पोळेकरने 3 देशी बनावटीची पिस्टल आणली होती. गेल्या महिनाभर तो शरद मोहोळकडे सतत ये जा करत होता. गेला आठवडाभर तर तो बॅाडीगार्ड म्हणून मोहोळच्या सोबत फिरत होता.
advertisement
सोबत राहूनच त्याने शरद मोहोळच्या हालचालींची माहिती मामा नामदेव कानगुडे याला दिली. आठवडाभरापूर्वी शरद मोहोळचा गेम करायचं निश्चित झालं. शुक्रवारी दुपारी जेवण करताना ही सोबत असलेल्या मुन्ना पोळेकरने मोहोळ दगडूशेठला पत्नीला घेऊन जाणार असल्याची माहिती देऊन आधीच शंकर गंडले आणि अमित कानगुडे या साथीदारांना रस्त्यात येऊन थांबायला सांगितलं होतं. बरोबर रस्त्यात असलेल्या सीसीटीव्हीचा अंदाज घेऊन मागून चालणाऱ्या मुन्ना पोळेकरने त्याच्या आजूबाजूला कुणी नसल्याची खात्री करत अगदी दीड फुटांवरून पहिली गोळी झाडली. त्या धक्क्याने शरद मोहोळने मागे वळून पाहिल्यावर दुसरी गोळी झाडली. जी थेट मोहोळच्या छातीत घुसली. तोवर बाजूला थांबलेल्या शंकर गंडले आणि अमित कानगुडे यांनी ही गोळ्या झाडल्या. काहीतरी घडल्या हे लक्षात आल्यावर नेहमी शरद मोहोळच्या पुढे चालणाऱ्या त्याच्या विश्वासू पप्पू उतेकरने मागे वळून पाहिलं आणि गोळ्या झाडणार्यांवर झडप घालून शंकर गंडलेला पकडलं पण तोवर शरद मोहोळ खाली पडलेला बघून तो त्याच्याकडे धावला आणि तिन्ही हल्लेखोरांनी पळ काढला. सीसीटीव्हीत ही दृश्य स्पष्ट दिसत आहेत. पोलिसांनी खुनाचं कारण स्पष्ट केलंय. पूर्व वैमनस्य.
advertisement
advertisement
हत्या करून आरोपी रिक्षाने चांदणी चौकापर्यंत गेले आणि तिथून गाडी घेऊन आलेल्या नामदेव कानगुडेच्या मदतीने साताऱ्याच्या दिशेनं पळून गेले. तोवर सीसीटीव्हीचा माग काढणाऱ्या गुन्हे शाखेला आरोपी सातारा रस्त्यावर गेल्याची माहिती मिळाली. तिथे गाडी खेड शिवापूर टोलनाक्याच्या पुढे बाजूला लाऊन त्यांनी वकिलांना संपर्क केला. वकिलांना बोलवून घेऊन पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी आरोपीना तिथेच अटक केली. त्याच्याकडून 3 पिस्टल, मॅग्झीन आणि पाच जिवंत राऊंड जप्त केले. ठोकायच तर मोठ्या कुणालातरी या मुळशी पॅटर्न सिनेमातला डायलॅाग शरद मोहोळच्या हत्येचा महत्वाचा पैलू आहे. कारण सीसीटीव्हीच्या खाली हत्या करण्यापासून ते मोहोळ टोळीत दाखल होणं हे सगळं फक्त मोठा गुन्हेगार होण्याच्या उद्देशाने केलेला गुन्हा आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 06, 2024 9:22 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Sharad Mohol murder : शरद मोहोळचा गेम वाजवणाऱ्या मुन्ना पोळेकरचा VIDEO व्हायरल, KGF स्टाईल केलं होतं प्लॅनिंग!









