'धन्यवाद पंतप्रधान मोदी' म्हणत पुण्यात भाजपकडून GST आनंदोत्सव साजरा

Last Updated:

केंद्र सरकारने GST मध्ये सुधारणा करून GST कमी केल्यानंतर पुण्यात भाजपकडून आनंदोउत्सव साजरा करण्यात आला.

News18
News18
अभिजीत पोते, पुणे: एकीकडे गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात अस्मानी संकट कोसळलं आहे. पावसाने अक्षरशः थैमान घालत शेतकऱ्यांना रस्तावर आणलं आहे. अनेक गावे स्थलांतरित करण्यात आली आहेत, शेतकरी मदतीसाठी अक्षरशः टाहो फोडून रडत आहेत. आपला संसार, आपली शेती, आपलं घर पावसापासून वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने सरकारला विनंती करत आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांसह अख्ख मंत्रिमंडळ बांधावर गेलं. अनेक शेतकऱ्यांनी या मंत्र्यांसमोर अक्षरशः टाहो फोडला. मराठवाड्याचं हे विदारक दृश्य असताना दुसरीकडे भाजपाने आज पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित धन्यवाद मोदी सरकार म्हणत GST साठी आनंदोत्सव साजरा केला.
पुण्यातल्या सगळ्यात श्रीमंत लक्ष्मी रोडवर असणाऱ्या शगुन चौकात भाजपचे हे कार्यकर्ते जमले. यात अगदी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह पुणे शहरातले भाजपचे सगळे मुख्य नेते उपस्थित होते. भाजप पदाधिकाऱ्यांनी मोदी नामाचा जप करत जीएसटीमधील सुधारणेचा आनंद साजरा केला.
राज्यातील काही जिल्ह्यात गंभीर परिस्थिती असताना पुण्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं. निमित्त होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जीएसटीच्या धोरणांमध्ये बदल केल्याबद्दल पुण्यातील लक्ष्मी रोड वरील शगुन चौकात "आनंदोत्सव" या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी "धन्यवाद, मोदी सरकार" अशा घोषणा सुद्धा दिल्या. यावेळी माध्यम प्रतिनिधी यांनी राज्यातील पूरस्थिती असताना या "आनंदोत्सव" बद्दल प्रश्न विचारला असता "हा आनंदोत्सव नव्हे तर जनतेशी संवाद साधण्यासाठी आम्ही आलो असल्याचं" भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उत्तर दिलं. विशेष म्हणजे भाजपच्या शहर माध्यम समन्वयक यांच्याकडून या "आनंदोत्सव" चा आमंत्रणाचा निरोप दिवसातून ३ वेळा अनेकांपर्यंत पोहचला होता.
मराठी बातम्या/पुणे/
'धन्यवाद पंतप्रधान मोदी' म्हणत पुण्यात भाजपकडून GST आनंदोत्सव साजरा
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement