IND vs BAN : संजुच्या आधी अक्षरला पाठवण्याच्या निर्णयाचा राग येईल, पण कॅप्टन सूर्याचे लॉजिक काय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सुर्यकुमार यादवने संजू सॅमसनला न पाठवता त्याच्या जागी अक्षर पटेलला पाठवले होते.त्यामुळे सुर्याच्ं लॉजिंक कुणालाच कळालं नव्हत.
India vs Bangladesh Super 4 Match : बांग्लादेशविरूद्ध फलंदाजी करताना भारताने पहिल्या बॉलपासून आक्रामक खेळी केली आहे. या आक्रामक खेळीमुळेच भारताने अवघ्या 6 ओव्हरमध्ये 77 धावा केल्या होत्या. यानंतर टीम इंडियाच्या विकेट पडायला सूरूवात झाली होती. पण हार्दिक पांड्या मैदानात असताना सुर्यकुमार यादवने संजू सॅमसनला न पाठवता त्याच्या जागी अक्षर पटेलला पाठवले होते.त्यामुळे सुर्याच्ं लॉजिंक कुणालाच कळालं नव्हत.
advertisement
खरं तर हार्दिक पांड्या फलंदाजीला उतरला असताना तिलक वर्मा बाद झाला.त्यानंतर संजू सॅमसनला जर मैदानात पाठवलं असंत दोन्ही राईट कॉम्बिनेशनवाले बॅटर मैदानात असते.त्यामुळे राईट आणि लेफ्ट कॉम्बिनेशनसाठी हार्दिक पांड्यासोबत अक्षर पटेलला पाठवण्याचा निर्णय सुर्यकुमारने घेतला आणि संजू सॅमसनला मागे ठेवण्यात आले होते. पण त्याला मैदानात उतरायची संधीच मिळाली नाही.
advertisement
टीम इंडियाचा सलामीवर शुभमन गिल आणि अभिषेक शर्माने चांगली सूरूवात केली होती. दोघांनी 77 धावांपर्यंत नाबाद फटकेबाजी केली होती.त्यानंतर शुभमन गिल 29 धावांवर बाद झाला होता. त्याच्यानंतर शिवम दुबे मैदानात आला होता. पण तो देखील 2 धावा करून बाद झाला.त्यानंतर मैदानात कर्णधार सुर्यकुमार यादवची एंन्ट्री झाली होती. भारताचे एका मागुन एक विकेट पडत असतान दुसरीकडुन अभिषेक शर्माची फटकेबाजी सूरूच होती. अभिषेक शर्मा अवघ्या 40 ते45 बॉलमध्ये शतक ठोकेल असे वाटत असताना मोठा घात झाला.
advertisement
त्याचं झालं असं की सुर्या स्ट्राईकवर असताना त्याने विकेट मागे कट मारला आणि नॉन स्ट्राईक एंडवरून धावत सुटला.पण खेळाडूने बॉल पकडल्याचे पाहून सूर्याने त्याला नकार दिला.तिथपर्यंत अर्ध्या क्रिजपर्यंत अभिषेक आला होता. पण खेळाडूने नॉन स्ट्राईकवर बॉल टाकून त्याला रनआऊट केले.त्यामुळे अभिषेक शर्मा 37 बॉलमध्ये 75 धावा करून बाद झाला.या खेळीत त्याने 5 षटकार आणि 6 चौकार लगावले होते.
advertisement
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर सुर्याने देखील विकेट फेकली होती,सुर्याच्या बॅटीला कड लागून बॉल थेट विकेटच्या हातात गेला होता.त्यामुळे अभिषेक शर्माला रनआऊट करून आणि सुर्याने स्वत:विकेट फेकून पायावर धोंडा मारला होता. दरम्यान सुर्या बाद झाल्यानंतर तिलक वर्मा देखील 5 धावांवर बाद झाला आहे.त्यामुळे भारताचा डाव गडगडला आहे.
advertisement
दरम्यान त्यानंतर हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलने भारताचा डाव सावरला. पण या खेळाडूंना भारताची धावगती वाढवता आली नाही.त्यामुळे टीम इंडिया 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 168 धावा करू शकली. टीम इंडियाकडून सर्वाधित खेळी अभिषेक शर्माने 75 धावांची केली.त्याच्यानंतर हार्दिक पांड्याने 35 धावा केल्या.त्यामुळे भारत 168 धावा करू शकली आता बांग्लादेशसमोर 169 धावांचे आव्हान आहे.
advertisement
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन):
सैफ हसन, तन्झिद हसन तमीम, परवेझ हुसेन इमोन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, जाकेर अली (कर्णधार-विकेटकीपर), मोहम्मद सैफुद्दीन, रिशाद हुसेन, तनझिम हसन साकिब, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान
भारत (प्लेइंग इलेव्हन):
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 9:54 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs BAN : संजुच्या आधी अक्षरला पाठवण्याच्या निर्णयाचा राग येईल, पण कॅप्टन सूर्याचे लॉजिक काय?


