Ration Card e-KYC: रेशनसाठी आता घरबसल्या करा ई-केवायसी, आपल्या मोबाईलवरून फक्त हे करायचं!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Ration Card: आता लाभार्थ्यांना e-KYC साठी रेशन दुकानात जाण्याची गरज नाही. तर घरी बसूनच आपल्या मोबाईलवरून ई-केवायसी करता येणार आहे.
पुणे : राज्यातील सर्व रेशनकार्ड धारकांना ई-केवायसी बंधनकारक केलीये. आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानातून ई-पॉस मशीनद्वारे मोफत केवायसी करण्यात येत होती. परंतु, ही केवायसी करताना अनेक अडचणी येत होत्या. आता शासनाने रेशनकार्डधारकांसाठी खूशखबर दिली असून ई-केवायसीची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली आहे. तसेच आता लाभार्थ्यांना रेशन दुकानात जाण्याची गरज नाही. तर घरी बसूनच आपल्या मोबाईलवरून ई-केवायसी करता येणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानांमार्फत धान्य वितरित केले जाते. शासनाच्या निर्देशानुसार सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक आहे. आता नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने ‘मेरा ई-केवायसी’मोबाईल ॲप कार्यरत केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही रास्त भाव धान्य दुकानात न जाता घरबसल्या स्वत:च्या व आपल्या शिधा पत्रिकेतील सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे.
advertisement
असे करा ई-केवायसी अपडेट
ई-केवायसी करण्यासाठी आधार फेस आरडी सेवा ॲप, मेरा ई-केवायसी मोबाईल ॲप असे दोन ॲप कार्यान्वित केले आहेत. हे दोन्ही ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे आवश्यक आहे. तरच आपल्याला ई-केवायसी करता येऊ शकते, अशी माहिती देण्यात आलीये. मेरा ई-केवायसी मोबाईल ॲप डाऊनलोड करा. या ॲपवर फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान्वादेर झटपट व सोप्या पद्धतीने पडताळणी होऊ शकते. रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य ई-केवायसी करू शकतो.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
March 03, 2025 2:03 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ration Card e-KYC: रेशनसाठी आता घरबसल्या करा ई-केवायसी, आपल्या मोबाईलवरून फक्त हे करायचं!