advertisement

पिंपरी-चिंचवडमध्ये ट्रॅफिक जॅमची शक्यता! भोसरी, चिखली आणि चाकणमधील 'हे' रस्ते बंद; पाहा पर्यायी मार्ग

Last Updated:

उद्या म्हणजेच गुरुवारी (दि. २६ मार्च) रामनवमीचा उत्साह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळणार आहे. यानिमित्त शहराच्या विविध भागात भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाहतुकीत बदल (फाईल फोटो)
वाहतुकीत बदल (फाईल फोटो)
पिंपरी : उद्या म्हणजेच गुरुवारी (दि. २६ मार्च) रामनवमीचा उत्साह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळणार आहे. यानिमित्त शहराच्या विविध भागात भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्त्वाच्या मार्गांवर निर्बंध लादले असून अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत.
वाहतुकीत नेमके काय बदल?
वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० ते रात्री १० या वेळेत शहरातील प्रमुख मार्गांवर सर्वसामान्य वाहनांना प्रवेश बंदी असेल. भोसरी, चिखली आणि चाकण या तीन महत्त्वाच्या विभागांतर्गत खालील बदल करण्यात आले आहेत:
भोसरी परिसर: हरिओम स्वीट चौक ते दिघी रोड आणि दिघी चौक ते दिघी रोड हा मार्ग पूर्णपणे बंद असेल. या भागातील वाहतूक आळंदी रोडमार्गे वळवण्यात आली आहे.
advertisement
चिखली/मोशी परिसर: पुणे-नाशिक महामार्गावरून मोशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि कुदळवस्तीकडे जाणारी वाहतूक बंद राहील. वाहनचालकांनी भारतमाता चौकाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा.
चाकण परिसर: चाकण चौक, महात्मा फुले चौक, नेहरू चौक, आंबेठाण चौक आणि मार्केट यार्ड परिसरातील वाहतूक आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.
अत्यावश्यक सेवांना सूट
मिरवणुकीत सहभागी असलेली वाहने आणि रुग्णवाहिकांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना या निर्बंधांमधून वगळण्यात आले आहे. मात्र, इतर सर्व खाजगी आणि सार्वजनिक वाहनांना या मार्गांवर प्रवेश मिळणार नाही.उद्या दिवसभर शहरातील मुख्य चौकांमध्ये गर्दी होण्याची शक्य ता असल्याने, नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पिंपरी-चिंचवडमध्ये ट्रॅफिक जॅमची शक्यता! भोसरी, चिखली आणि चाकणमधील 'हे' रस्ते बंद; पाहा पर्यायी मार्ग
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement