Pune News:पुणेकरांनो बस चालक मोबाईल वापरताना दिसला तर लगेच सांगा; पीएमपीच्या बस चालकाचं थेट निलंबन
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
भेकरईनगर डेपोच्या ई-बसवरील चालक रणजित झेडगे हा कर्तव्यावर असताना मोबाईलचा वापर करत असल्याचे आढळून आले. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) कर्तव्यावर असलेल्या चालक आणि वाहकांना मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई केली आहे. असं असतानाही या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी एका ई-बस चालकावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चालकांच्या बेशिस्तीमुळे होणारे संभाव्य अपघात आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने हे कठोर पाऊल उचललं आहे.
पीएमपीएमएलचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी परिवहन महामंडळाच्या सेवेत शिस्त आणण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. याच अनुषंगाने, डेपो प्रमुख आणि विभाग प्रमुखांना रस्त्यावर उतरून कामकाजाचे निरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. या तपासणीदरम्यान अनेक बस चालक वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. मोबाईलच्या वापरामुळे अपघात होण्याची शक्यता वाढत असल्याने, पीएमपीएल अध्यक्ष पंकज देवरे यांनी 'चालक मोबाईल वापरताना आढळल्यास तत्काळ निलंबित करा', असे सक्त आदेश दिले होते.
advertisement
या आदेशाची अंमलबजावणी करताना भेकरईनगर डेपोच्या ई-बसवरील चालक रणजित झेडगे हा कर्तव्यावर असताना मोबाईलचा वापर करत असल्याचे आढळून आले. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, पुढील आदेश मिळेपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे काम न देण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
advertisement
या कारवाईमुळे अन्य चालक आणि वाहकांनाही सक्त संदेश मिळाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या उद्देशाने पीएमपी प्रशासनाने हा कडक पवित्रा घेतला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक डेपोमध्ये नियमित तपासणी आणि नियमावलीचे प्रशिक्षण सक्तीचे केले जाणार असल्याचेही प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 01, 2025 9:51 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News:पुणेकरांनो बस चालक मोबाईल वापरताना दिसला तर लगेच सांगा; पीएमपीच्या बस चालकाचं थेट निलंबन


