Pune Murder: आयुष कोमकर हत्येप्रकरणी पुण्याच्या आयुक्तांची खळबळजनक कबुली, म्हणाले, आजोबाच नातवाचा जीव...
- Published by:Prachi Amale
- Reported by:VAIBHAV SONAWANE
Last Updated:
आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी 48 तासानंतर खळबळजनक कबुली दिली आहे.
पुणे: एका वर्षापूर्वी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची हत्या झाली, त्याच ठिकाणी बदला म्हणून 20 वर्षांच्या भाच्याला गोळ्या घालून संपवलं. पुण्यातील आंदेकर-कोमकर टोळीयुद्धामध्ये गोविंद उर्फ आयुष कोमकर या 20 वर्षांच्या युवकाची हत्या करण्यात आली. आयुष कोमकर हा कुख्यात गुंड गणेश कोमकरचा मुलगा आहे. तर गणेश कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे.आयुषची हत्या ही हत्या त्याचे आजोबा म्हणजे गुंड बंडू आंदेकरांनी केल्याची चर्चा होती. अखेर आज पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी ४८ तासानंतर आजोबांनीच हत्या घडवून आणल्याची खळबळजनक कबुली माध्यमांशी बोलताना दिली आहे.
गणेश कोमकर याची पत्नी कुख्यात गुंड बंडू आंदेकर याची मुलगी आहे. ती वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपी आहे. वनराजच्या खुनानंतर आंदेकर-कोमकर यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आंदेकर-कोमकर संघर्षात बंडू आंदेकरच्या नातवाचा बळी गेला. 18 वर्षांचा गोविंद क्लासवरून घरी परतला असताना त्याच्यावर पार्किंगमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. वनराजचे वडील आणि गोविंदचे आजोबा बंडू आंदेकरानी ही हत्या घडवून आणल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
advertisement
सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कठोर कारवाई , आयुक्तांचा गंभीर इशारा
अमितेश कुमार म्हणाले, आयुष कोमकर हत्या प्रकरणी आम्ही काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच काही दिवसापू्र्वी आम्हाला एक टीप मिळाली होती त्यानुसार आम्ही कारवाई करत मोठा कट उधाळला होता. कोणी स्वत:च्या नातवाला मारेल अशी कोणतीही गुप्तवार्ता मिळाली नव्हती. ज्या आरोपींना हे घृणास्पद कृत्य केली त्यांना तसेच त्या टोळीला मदत करणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागणार आहे. सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कडक कारवाई पुढील काही दिवसात सगळ्यांना दिसेल. काही आरोपींना यामध्ये अटक केली आहे राहिल्यांना पुढे अटक केली जाईल.
advertisement
आजोबा नातवाचा पक्का वैरी
आजोबा हा नातवाचा पहिला दोस्त असतो, आणि नातू हा आजोबाचा शेवटचा दोस्त असल्याचं बोललं जातं. नात्याची खरी जडण घडण तिथूनच होत असते. मात्र इकडे मात्र आजोबा आणि नातवाचं पक्क वैर पाहायला मिळालं. वनराज आंदेकर याचे वडील बंडू आंदेकरांची टोळी पुण्यातील जुन्या टोळींपैकी एक आहे. आंदेकर टोळी आणि माळवदकर या दोन्ही टोळ्यांमध्ये संघर्ष झाला होता. या टोळीयुद्धातून प्रमोद माळवदकर याचा खून झाला होता. त्या प्रकरणात बंडू आंदेकर याला जन्मठेप झाली होती. गेल्या पंचवीस वर्षांपासून आंदेकर टोळीचा पुण्यातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये हात होता.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 07, 2025 7:23 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Murder: आयुष कोमकर हत्येप्रकरणी पुण्याच्या आयुक्तांची खळबळजनक कबुली, म्हणाले, आजोबाच नातवाचा जीव...