Aly Goni Ganeshotsav Controversy : 'माझ्या धर्मामध्ये...', गणपतीचा जयघोष न करण्याबाबत अली गोनी स्पष्टच बोलला

Last Updated:

Aly Goni Ganeshotsav Controversy : जास्मिन भसीनसोबत गणपती दर्शनाला गेलेल्या अली गोनीने जयघोष न केल्याने ट्रोल झाला. आता अलीने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं.

News18
News18
मुंबई : संपूर्ण राज्यात गेले दहा दिवस अतिशय जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला. अनेक कलाकारांनीही आपल्या घरी बाप्पाचे स्वागत केले. टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीनने बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी तिचा बॉयफ्रेंड अभिनेता अली गोनी मात्र 'गणपती बाप्पा मोरया' न म्हटल्याने जोरदार ट्रोल झाला आहे. या वादावर आता त्याने स्वतःच उत्तर दिलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

अली गोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात तो त्याची गर्लफ्रेंड जास्मिन भसीनसोबत गणपतीच्या दर्शनासाठी गेला होता. व्हिडिओमध्ये जैस्मिन 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत असताना, तिच्या बाजूला उभा असलेला अली गोनी मात्र गप्प होता आणि त्याने हळूच तोंड दुसरीकडे फिरवलं. यावरून नेटकऱ्यांनी त्याला खूप ट्रोल केलं. त्यांनी म्हटलं की, “जैस्मिन त्याच्यासाठी दर्ग्यात जाते, पण अली गोनी तिच्यासाठी गणपतीचा जयघोषही करू शकत नाही.”
advertisement

अली गोनीने दिलं स्पष्टीकरण

या घटनेवर आता अली गोनीने 'फिल्मीज्ञान'सोबत बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाला, “मला कळलंच नाही की याचा एवढा मोठा मुद्दा होईल. मी फक्त माझ्या विचारांमध्ये हरवून गेलो होतो. मी काय करतोय, याकडे माझं लक्ष नव्हतं.” तो पुढे म्हणाला की, तो पहिल्यांदाच गणपतीच्या पूजेला गेला होता आणि त्याला काय करायचं हे माहीत नव्हतं. तो म्हणाला, “मला वाटत होतं की माझ्याकडून काही चूक होऊ नये, म्हणून मी अशा ठिकाणी जात नव्हतो.”
advertisement
advertisement

“माझ्या धर्मात याची परवानगी नाही!”

आपल्या धर्माचा हवाला देत अली गोनी म्हणाला, “माझ्या धर्मात याची परवानगी नाही. आम्ही पूजा करत नाही. आम्ही फक्त दुआ करतो, नमाज पढतो आणि सर्व धर्मांचा आदर करतो. हेच कुराणमध्ये लिहिलं आहे आणि मी सगळ्या धर्मांचा आदर करतो.”
advertisement
अलीच्या या स्पष्टीकरणानंतरही काही लोक त्याला पाठिंबा देत आहेत, तर काही लोक अजूनही त्याला ट्रोल करत आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Aly Goni Ganeshotsav Controversy : 'माझ्या धर्मामध्ये...', गणपतीचा जयघोष न करण्याबाबत अली गोनी स्पष्टच बोलला
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement