बारामती हादरली! गाडीतून आले अन् 5 जणांवर कोयत्याने सपासप वार, नवरात्रीत रक्तरंजित कांड

Last Updated:

Pune Baramati Crime : बारामती तालुक्यात वंजारवाडी गावातील दत्त मंदिरासमोर ही घटना घडली आहे. जुन्या वादातून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दत्त मंदिरासमोर पाच जणांवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे.

Pune Baramati Crime
Pune Baramati Crime
Pune Crime News : गेल्या काही दिवसांपासू्न पुणे शहरातील गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाल्यानंतर आता पुणे जिल्ह्यात देखील गुन्हेगार हातपाय वर काढत आहेत. अशीच घटना बारामती तालुक्यात देखील पहायला मिळाली आहे. बारामती तालुक्यात वंजारवाडी गावातील दत्त मंदिरासमोर ही घटना घडली आहे. जुन्या वादातून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दत्त मंदिरासमोर पाच जणांवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

नेमकं काय घडलं?

सोमवारी फिर्यादी अमोल चौधर हे भारत चौधर, सागर चौधर, आदित्य चौधर, सुनील चौधर व इतरांसह नवरात्रोत्सव सुरू असल्याने देवीची ज्योत राशीन येथून वंजारवाडी येथे दत्त मंदिरासमोर घेऊन आले. मंदिरासमोर पुजा करून पारंपरिक वाद्यावर उत्सव साजरा करीत असतानाच रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एक चारचाकी त्या ठिकाणी आली. या गाडीतून सात जण ओळखीचे, तर अज्ञात दोघं हातात कोयता, चाकू अशी हत्यारं घेऊन उतरले अन् हल्ला केला.
advertisement
वंजारवाडी येथील दत्त मंदिरासमोर आरोपींनी चौधर यांना पाहिल्यानंतर शस्त्र काढली अन् सपासप वार केले. या हल्ल्यात फिर्यादीसह अनेकजण जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील तपास करीत आहेत.
हृतिक ऊर्फ गुड्या मुळीक, ओम अर्जुन कुचेकर, अली मुजावर, दीपक भोलनकर, रवी माने, शुभम वाघ आणि तेजस हजारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यातील शुभम वाघ, अली मुजावर आणि ओम कुचेकर या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात अण्णा चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. या हल्ल्यात सुनील गोरख चौधर, अमोल आण्णा चौधर, भारत गोकुळ चौधर, सागर चंद्रकांत चौधर आणि आदित्य सर्जेराव चौधर हे 5 जण जखमी झाले आहेत. पाचही जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलंय.
मराठी बातम्या/पुणे/
बारामती हादरली! गाडीतून आले अन् 5 जणांवर कोयत्याने सपासप वार, नवरात्रीत रक्तरंजित कांड
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement