advertisement

पुणेकरांनो आता सावधच राहा! बिबवेवाडीत थेट घराच्या बेडरूममध्ये घुसून अज्ञातांचं धक्कादायक कांड, परिसरात खळबळ

Last Updated:

बिबवेवाडीतील महेश सोसायटीत राहणारे एक ज्येष्ठ नागरिक रविवारी काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. घर बंद असल्याचं पाहून पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी संधी साधली.

पुण्यात घरफोडीची धक्कादायक घटना (प्रतिकात्मक फोटो)
पुण्यात घरफोडीची धक्कादायक घटना (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुणे शहरात घरफोड्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. बिबवेवाडी परिसरातील महेश सोसायटीमध्ये एका बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १६ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
बिबवेवाडीतील महेश सोसायटीत राहणारे एक ज्येष्ठ नागरिक रविवारी काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. घर बंद असल्याचं पाहून पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी संधी साधली. अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाट उचकटलं. कपाटात ठेवलेले सोन्याचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १६ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.
advertisement
ज्येष्ठ नागरिकाची पोलिसात धाव
तक्रारदार घरी परतल्यानंतर त्यांना घराचं कुलूप तुटलेलं दिसलं. घरात प्रवेश करताच कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं आणि दागिने गायब असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. याप्रकरणी त्यांनी तातडीनं बिबवेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. सोसायटीतील आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी गुन्हे शाखेची मदत घेतली जात आहे. वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे मोठी घरफोडी झाल्याने पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो आता सावधच राहा! बिबवेवाडीत थेट घराच्या बेडरूममध्ये घुसून अज्ञातांचं धक्कादायक कांड, परिसरात खळबळ
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement