advertisement

महापौर निवड होताच पहिली कारवाई! पुणे भाजपमध्ये मोठी 'साफसफाई', माजी नगरसेवकासह 69 जणांची हकालपट्टी

Last Updated:

महापौर निवड होताच भाजपने पुण्यात पहिली कारवाई केली आहे. महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शहरातील बंडखोर नेत्यांविरुद्ध कठोर पाऊल उचलले आहे.

पुण्यात भाजपची मोठी कारवाई (फाईल फोटो)
पुण्यात भाजपची मोठी कारवाई (फाईल फोटो)
पुणे: महापौर निवड होताच भाजपने पुण्यात पहिली कारवाई केली आहे. महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शहरातील बंडखोर नेत्यांविरुद्ध कठोर पाऊल उचलले आहे. पक्षाची शिस्त मोडीत काढून उमेदवारीसाठी बंडाचे निशाण फडकवणाऱ्या आणि पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या तब्बल ६९ जणांचे सदस्यत्व ६ वर्षांसाठी रद्द करण्यात आले आहे. या धडाकेबाज निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रमुख नेत्यांवर कारवाईची कुऱ्हाड
भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार हे आदेश जारी केले आहेत. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये बाणेरचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर, धनंजय जाधव, संदीप जऱ्हाड आणि सुनीता गलांडे यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. याशिवाय अनिता तलाठी, पल्लवी गाडगीळ, रमेश भंडारी, संदीप लोणकर यांसह ६९ कार्यकर्त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
advertisement
कारवाईचं कारण काय?
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अधिकृत तिकीट न मिळाल्याने अनेकांनी अपक्ष किंवा इतर पक्षांतून उमेदवारी अर्ज भरले होते. पक्षात राहूनही भाजप उमेदवाराचा पराभव करण्यासाठी छुपी मदत केल्याचा ठपका अनेक कार्यकर्त्यांवर ठेवण्यात आला आहे. अनेकांनी हकालपट्टी होण्यापूर्वीच तांत्रिकदृष्ट्या पक्षाला 'रामराम' ठोकला होता, मात्र आता भाजपने अधिकृतपणे त्यांची हकालपट्टी जाहीर केली आहे.
advertisement
पुढील कारवाईचे संकेत
भाजपने ही कारवाई करून एक प्रकारे शिस्तीचा इशारा दिला आहे. दरम्यान, ज्या कार्यकर्त्यांनी अद्याप उघडपणे बंड केले नाही मात्र पडद्यामागून पक्षाला विरोध केला आहे, अशा अन्य काही प्रमुख नावांवरही लवकरच कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
महापौर निवड होताच पहिली कारवाई! पुणे भाजपमध्ये मोठी 'साफसफाई', माजी नगरसेवकासह 69 जणांची हकालपट्टी
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement