advertisement

5 स्टार हॉटेलमध्ये लग्न, पण वर्षाआधीच बिनसलं, जोडपं परदेशात अन् दोघांच्या आईंनीच केला घटस्फोट!

Last Updated:

Pune News: या जोडप्याच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठी दोन्ही कुटुंबातील आई न्यायालयात हजर राहिल्या आणि त्यांच्या उपस्थितीत घटस्फोटाची प्रक्रिया पार पडली.

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न, वर्षाच्या आधीच बिनसलं, जोडपं परदेशात अन् दोन्ही आईंनीच केला घटस्फोट!
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न, वर्षाच्या आधीच बिनसलं, जोडपं परदेशात अन् दोन्ही आईंनीच केला घटस्फोट!
पुणे: गेल्या काही वर्षांपासून घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मुलांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आई-वडील सातत्याने प्रयत्न करत असतात. मुलांच्या आनंदासाठी ते कोणतीही गोष्ट करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. पुण्यातील एका घटस्फोटाच्या प्रकरणात असाच एक प्रकार पाहायला मिळाला. मुलांच्या सुखासाठी विवाह जमवून दिलेल्या या जोडप्याच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठी दोन्ही कुटुंबातील आई न्यायालयात हजर राहिल्या आणि त्यांच्या उपस्थितीत घटस्फोटाची प्रक्रिया पार पडली. या जोडप्याचा संसार अवघ्या वर्षभरातच तुटला आहे.
घटस्फोटाचं कारण काय?
राहुल आणि नेहा (नावे बदलली आहेत) यांचा विवाह 28 जून 2023 रोजी कोरेगाव पार्क येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला होता. दोघेही परदेशात आयटी कंपनीत उच्चपदावर नोकरी करत असून लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने ते एकत्र राहत होते. मात्र, विचार न जुळणे आणि सततचे मतभेद यामुळे दोघांमध्ये तणाव वाढला. लग्नाला वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. अपत्य नसल्याने त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे ठरवून पुणे येथील कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला.
advertisement
दोघेही परदेशात वास्तव्यास असल्याने प्रत्येक सुनावणीसाठी भारतात येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या आईंना मुखत्यारपत्र देत न्यायालयीन प्रक्रियेचे अधिकार दिले. यानंतर दोन्ही कुटुंबातील आई न्यायालयात हजर राहून घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत होत्या.
दरम्यान, न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पती-पत्नीशी संवाद साधून त्यांचा निर्णय स्वेच्छेने घेतलेला असल्याची खातरजमा केली. पती-पत्नी काही काळापासून विभक्त राहत असल्याने न्यायालयाने सहा महिन्यांचा फेरविचार कालावधी शिथिल करून अवघ्या दोन महिन्यांत घटस्फोट मंजूर केला.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
5 स्टार हॉटेलमध्ये लग्न, पण वर्षाआधीच बिनसलं, जोडपं परदेशात अन् दोघांच्या आईंनीच केला घटस्फोट!
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement