Pune Crime : पुण्यातील शनिवार पेठेत 80 वर्षीय आईवर चाकूने वार, अविनाश दारुच्या नशेत घरी आला अन्...

Last Updated:

Pune Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अविनाश, त्याची आई कुसुम आणि तक्रारदार आशिष अंकुश सोसायटीत राहतात. संपत्तीवरून त्यांच्यात वाद सुरू होता.

Pune Crime Attack On 80 year old lady by 65 year old son
Pune Crime Attack On 80 year old lady by 65 year old son
Attack On 80 year old lady in Pune : पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुका सुरू असताना, शनिवार पेठेत एका 65 वर्षीय व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपली 80 वर्षांची आई आणि भाच्यावर चाकूने वार केले. ही घटना शनिवारी रात्री घडली असून, विश्रामबाग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जखमी आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

अविनाश पांडुरंग साप्ते (वय 65, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या हल्ल्यात त्याची आई कुसुम साप्ते (वय 80) आणि भाचा आशिष अशोक समेळ (वय 45) जखमी झाले आहेत. याप्रकरणी आशिष समेळ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
advertisement

अंकुश सोसायटीत काय घडलं?

ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास मेहुणपुरा येथील अंकुश सोसायटीत घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अविनाश, त्याची आई कुसुम आणि तक्रारदार आशिष एकाच सोसायटीत राहतात. त्यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू होता.

आईसोबत भांडण केलं अन्...

घटनेच्या रात्री अविनाश दारू पिऊन घरी आला. त्याने आईसोबत भांडण सुरू केले. रागाच्या भरात त्याने आईच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर चाकूने वार केले. आजीला वाचवण्यासाठी आशिष समेळ धावले असता, अविनाशने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून अविनाशला अटक केली. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या कुसुम साप्ते यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यातील शनिवार पेठेत 80 वर्षीय आईवर चाकूने वार, अविनाश दारुच्या नशेत घरी आला अन्...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement