advertisement

Pune Crime : शॉकिंग! पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर सापडला मृतदेह! 2 दिवसांपासून बेपत्ता, अपघात की घातपात? कल्याण दरवाजात काय घडलं?

Last Updated:

Pune Crime Body found at Sinhagad Fort : दशरथ शंकर धोत्रे असं या मयत व्यक्तीचं नाव असून तो मुळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी होता.

Pune Crime Body found at Sinhagad Fort
Pune Crime Body found at Sinhagad Fort
Pune Singhad Fort Crime : पुण्यातील प्रसिद्ध अशा सिंहगड किल्ल्यावर धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणेकर विकेंडला सिंहगडावर जातात. पुण्याच्या डोक्यावरचा मुकूट असलेल्या सिंहगड किल्ल्यावर एक मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली. किल्ल्यावरील कल्याण दरवाजाच्या दरीत हा मृतहेद आढला आहे. दशरथ शंकर धोत्रे असं या मयत व्यक्तीचं नाव असून तो मुळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी होता. अशातच दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्यानंतर आता त्याचा मृतदेह आढळला आहे.

तो किल्ल्यावर आला अन् तिथंच...

दशरत हा तानाजी मालुसरे समाधिस्थळावर ठेकेदाराकडे मजुरीचं काम करत होता. चार दिवसांपूर्वीच तो किल्ल्यावर आला अन् तिथंच त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अशातच आता दशरतच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. किल्ल्यावरील कल्याण दरवाजाच्या परिसरातील दरीत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.
advertisement

4 दिवसांपूर्वीच सिंहगड किल्ल्यावर...

मयत दशरथ धोत्रे हा केवळ 4 दिवसांपूर्वीच सिंहगड किल्ल्यावर कामासाठी आला होता. तो त्यांच्या इतर 4 ते 5 साथीदारांसमवेत पुरातत्व विभागाचे काम करणाऱ्या एका ठेकेदाराकडे मजूर म्हणून कार्यरत होता. हे सर्व मजूर सिंहगड किल्ल्यावरच मुक्कामाला होता आणि किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचे काम पाहत होता.
advertisement

बुधवारी मध्यरात्रीपासून अचानक बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ धोत्रे हा बुधवारी मध्यरात्रीपासून अचानक बेपत्ता झाला होता. त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांना वाटलं की, तो कोणालाही न सांगता आपल्या गावी निघून गेले असावेत. दिवसभर त्याचा फोनही लागत नसल्याने त्याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही, मात्र सायंकाळी पर्यटकांना कल्याण दरवाजाच्या दरीत एक मृतदेह दिसला.
advertisement

दरीतून मृतदेह बाहेर काढला

या घटनेची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने गडावर धाव घेतली. अत्यंत कठीण परिस्थितीत दरीतून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि स्थानिक राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. प्राथमिक तपासानुसार, तो मृतदेह बेपत्ता असलेल्या दशरथ धोत्रे याचाच असल्याचे निष्पन्न झालं.
advertisement

आकस्मिक मृत्यूची नोंद 

दरम्यान, राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राजेंद्र गव्हाणे यांनी सांगितले की, या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : शॉकिंग! पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर सापडला मृतदेह! 2 दिवसांपासून बेपत्ता, अपघात की घातपात? कल्याण दरवाजात काय घडलं?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement