advertisement

पुण्यात कायद्याची भीती उरली की नाही? मगरपट्टा चौकात 7-8 जणांकडून धुडगूस, टपरी चालकाला बेदम मारहाण, CCTV मध्ये थरारक दृष्य समोर!

Last Updated:

Pune Crime Drunken Group Shop Vandalism : दुकानांची तोडफोड देखील केली आहे. हातात शस्त्रे घेऊन आलेल्या या तरुणांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

Pune Crime Magarpatta Chowk CCTV Video
Pune Crime Magarpatta Chowk CCTV Video
Pune Crime Magarpatta Chowk CCTV Video : पुण्यातील मगरपट्टा चौक परिसरात शनिवारी रात्री एका गुंडांच्या टोळीने धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे 7 ते 8 जणांच्या या टोळक्याने सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. या घटनेमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून स्थानिक रहिवाशांमध्ये सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

शिवीगाळ करत मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, या टोळक्याने केवळ आरडाओरडाच केला नाही, तर परिसरात असलेल्या दुकानांची तोडफोड देखील केली आहे. हातात शस्त्रे घेऊन आलेल्या या तरुणांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांची मोठी पळापळ झाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement

 हुल्लडबाजीचे व्हिडिओ समोर 

दहशत माजवण्यासाठी या टोळीने अनेकांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, पोलिसांच्या गस्तीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या हुल्लडबाजीचे व्हिडिओ आता समोर येत आहेत.
advertisement

कर्मचाऱ्यांमध्येही भीती पसरली

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मगरपट्टा सिटी हा पुण्यातील महत्त्वाचा IT हब मानला जातो, अशा सुरक्षित भागात असा व्हॉयलेन्स प्रकार घडल्याने आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्येही भीती पसरली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हासूचक कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
advertisement

CCTV कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपींची ओळख

हडपसर पोलिसांनी या गुंडांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. परिसरातील CCTV कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या वेळी पोलीस Patrol वाढवण्याची विनंती केली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात कायद्याची भीती उरली की नाही? मगरपट्टा चौकात 7-8 जणांकडून धुडगूस, टपरी चालकाला बेदम मारहाण, CCTV मध्ये थरारक दृष्य समोर!
Next Article
advertisement
Explainer : प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरिकेला! पाहा नेमकं काय घडलं?
प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरि
  • प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचालनात केवळ भारताची लष्करी ताकद दिसली नाही

  • तर बदलत्या जगाचं नवं राजकारणही पाहायला मिळालं.

  • भारताने जगाला दिलेला एक मोठा 'जिओपॉलिटिकल मेसेज' होता.

View All
advertisement