advertisement

देवदर्शनावेळी ओळख अन् शरीरसंबंध; मग पुण्याच्या गौरीचा त्याच्यासोबत भयंकर 'खेळ', महिलेला न्यायालयाचा दणका

Last Updated:

३ मार्च २०२५ रोजी एका देवदर्शनादरम्यान त्यांची ओळख गौरी वाजळे हिच्याशी झाली होती. या ओळखीचा फायदा घेत महिलेने तक्रारदाराशी जवळीक वाढवली आणि त्यांना शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले

महिलेचा अटकपूर्व जामीन फेटाळला (AI Image)
महिलेचा अटकपूर्व जामीन फेटाळला (AI Image)
पुणे : धार्मिक स्थळी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन एका विवाहित पुरुषाला जाळ्यात ओढणाऱ्या आणि त्यानंतर दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. कोथरूड पोलिसांनी दाखल केलेल्या या खंडणीप्रकरणी गौरी प्रल्हाद वाजळे (वय ४२, रा. वनाज, पुणे) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी फेटाळून लावला आहे.
देवदर्शन ठरलं महागात
या प्रकरणातील तक्रारदार हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील ४७ वर्षीय विवाहित पुरुष आहेत. ३ मार्च २०२५ रोजी एका देवदर्शनादरम्यान त्यांची ओळख गौरी वाजळे हिच्याशी झाली होती. या ओळखीचा फायदा घेत महिलेने तक्रारदाराशी जवळीक वाढवली आणि त्यांना शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. मात्र, त्यानंतर या नात्याचा वापर तिने चक्क पैसे उकळण्यासाठी सुरू केला.
advertisement
अत्याचाराच्या खोट्या तक्रारींची धमकी
आरोपी महिलेने तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास अत्याचाराची तक्रार करण्याची धमकी तिने दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या महिलेने यापूर्वी देखील पुण्यासह राज्यातील इतर शहरांमधील पोलीस ठाण्यांत अशाच प्रकारच्या अत्याचाराच्या तक्रारी दाखल केल्याचे तपासात समोर आले आहे.
न्यायालयाने जामीन का नाकारला?
तक्रारदाराने कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर, अटकेपासून वाचण्यासाठी गौरी वाजळेने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, सरकारी वकिलांनी या गुन्ह्याचे गांभीर्य आणि महिलेचा पूर्वेतिहास न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर न्यायालयाने तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
देवदर्शनावेळी ओळख अन् शरीरसंबंध; मग पुण्याच्या गौरीचा त्याच्यासोबत भयंकर 'खेळ', महिलेला न्यायालयाचा दणका
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement