advertisement

Gold News : सोनं-चांदीच्या दरात मोठा उलटफेर होणार, लग्नसराईपूर्वी केंद्र सरकारचा मोठा आदेश, किमतीवर येणार मोठा दबाव!

Last Updated:

Gold Silver Price: आता सरकारने आणखी एक महत्त्वाचा आदेश काढला आहे. ऐन लग्नसराई सुरू होण्याच्या आधीच सरकारने आदेश काढल्याने सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सोनं-चांदीच्या दरात मोठा उलटफेर होणार, लग्नसराईपूर्वी केंद्र सरकारचा मोठा आदेश, नेमकं होणार काय?
सोनं-चांदीच्या दरात मोठा उलटफेर होणार, लग्नसराईपूर्वी केंद्र सरकारचा मोठा आदेश, नेमकं होणार काय?
Gold News : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. अमेरिका-इराणमध्ये युद्ध सुरू असताना दुसरीकडे सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आता सरकारने आणखी एक महत्त्वाचा आदेश काढला आहे. ऐन लग्नसराई सुरू होण्याच्या आधीच सरकारने आदेश काढल्याने सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
जागतिक बाजारपेठेतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोने आणि चांदीच्या 'बेस इम्पोर्ट प्राईस' (Base Import Price) मध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्राफा बाजारासह गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, येणाऱ्या काळात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय झाला बदल?

सरकारने चांदीची बेस इम्पोर्ट प्राईस २,८२० डॉलर प्रति किलोवरून थेट २,४२७ डॉलर इतकी कमी केली आहे. याचाच अर्थ भारतीय चलनात चांदीच्या आधारभूत किमतीत जवळपास ३६,७०० रुपयांची मोठी घट झाली आहे. त्याचप्रमाणे, सोन्याची बेस प्राईस देखील १,६५२ डॉलर प्रति १० ग्रॅमवरून १,५२६ डॉलर करण्यात आली आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत सुमारे ११,७०० रुपयांची कपात दिसून येत आहे.
advertisement

सामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

'बेस इम्पोर्ट प्राईस' म्हणजे ती किंमत ज्यावर सरकार 'इम्पोर्ट ड्युटी' (आयात शुल्क) मोजते. ही किंमत कमी झाल्यामुळे आता आयातदारांना सोने-चांदी मागवण्यासाठी कमी टॅक्स द्यावा लागेल. याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवर होऊन सोनं-चांदीच्या किमती स्थिर राहण्यास किंवा कमी होण्यास मदत होऊ शकते. लग्नसोहळे आणि सणासुदीच्या हंगामापूर्वी घेतलेला हा निर्णय ज्वेलरी उद्योगासाठी आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
advertisement

बाजारपेठेचे गणित

तज्ज्ञांच्या मते, बेस प्राईस कमी झाल्यामुळे बाजारात लगेच मोठी घसरण दिसेलच असे नाही, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाव, डॉलर-रुपया विनिमय दर आणि मागणी यांसारख्या अनेक गोष्टींवर अंतिम दर अवलंबून असतात. मात्र, दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold News : सोनं-चांदीच्या दरात मोठा उलटफेर होणार, लग्नसराईपूर्वी केंद्र सरकारचा मोठा आदेश, किमतीवर येणार मोठा दबाव!
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement