Pune Crime : वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर जेलमधून पॅरोलवर बाहेर, पुण्यातील टोळीयुद्ध भडकणार?

Last Updated:

Pune Crime Ayush Komkar Murder Case : पुणे पोलिसांनी आयुष कोमकर हत्याप्रकरणात संपूर्ण आंदेकर फॅमिलीवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकरसह 13 जणांचा समावेश आहे. अशातच गणेश कोमकर याला पॅरोल मंजूर झालाय.

Ganesh Komkar released from jail on parole
Ganesh Komkar released from jail on parole
Ayush Komkar Murder Case Update : पुण्यात गणेशोत्सवाच्या धामधुमीत एका हत्याकांडामुळे पुन्हा एकदा गुन्हेगारी वर्तुळातील वाद चव्हाट्यावर आला आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी, आंदेकर टोळीने 5 सप्टेंबरला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे आयुष कोमकरची हत्या केली. आयुष हा वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा होता. तरी देखील बंडू आंदेकरने आपल्या नातवाला संपवण्यासाठी कोणतीही दयामाया दाखवली नाही. अशातच आता गणेश कोमकर याला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.

आयुषवर संध्याकाळपर्यंत अंत्यसंस्कार 

आयुषचे वडील आणि कुटुंबातील काही सदस्य सध्या तुरुंगात आहेत. आयुषच्या हत्येनंतर, जयंत कोमकर, संजीवनी कोमकर आणि गणेश कोमकर यांनी पॅरोलची मागणी केली होती. पोलिसांनी आयुषचा मृतदेह ससून रुग्णालयाच्या शवागारात ठेवला होता. आज मृतदेह ताब्यात घेऊन संध्याकाळपर्यंत अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे. या अंत्यसंस्कारासाठी, आयुषचे वडील आणि वनराज आंदेकर हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी गणेश कोमकर यांना पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
advertisement

बंडू आंदेकरवर खुनाचा गुन्हा 

माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष गणेश कोमकर याच्यावर गोळीबार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह 13 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकरसह आणखी एका महिलेचा समावेश आहे. या प्रकरणी यश पाटील आणि अमित पाटोळे यांना अटक केली आहे. दोन दिवस गणेशविसर्जन असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून आयुष कोमकर याच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर जेलमधून पॅरोलवर बाहेर, पुण्यातील टोळीयुद्ध भडकणार?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement