कोल्हापूर ते मुंबई प्रवास होणार सोयीचा; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, 20 विशेष फेऱ्या जाहीर, जाणून घ्या थांबे आणि वेळ
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Sangali News : सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक मोठा दिलासा दिला आहे. कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूरदरम्यान...
Sangali News : सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक मोठा दिलासा दिला आहे. कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूरदरम्यान एक विशेष साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यात आली आहे. 24 सप्टेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत या रेल्वेच्या एकूण 20 फेऱ्या होणार आहेत.
कोल्हापूर ते मुंबई (गाडी क्र. 01418) : ही विशेष रेल्वे प्रत्येक बुधवारी कोल्हापूरहून रात्री 10 वाजता सुटेल. रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी ती सांगली रेल्वे स्थानकात पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
मुंबई ते कोल्हापूर (गाडी क्र. 01417) : ही रेल्वे प्रत्येक गुरुवारी मुंबईहून दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. ती रात्री 9 वाजता सांगलीत पोहोचेल आणि पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी कोल्हापूरला दाखल होईल.
advertisement
या विशेष रेल्वेला मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, लोणंद, जेजुरी, पुणे, लोणावळा आणि कल्याण येथे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 3 तृतीय श्रेणी वातानुकूलित, 10 स्लीपर, 4 सामान्य, 2 सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील.
हे ही वाचा : 'बिंग फुटणार अन् लफडं जगाला कळणार', या भीतीने पोलीस भरती अकॅडमीच्या संचालकाचा मोठा कांड, पण पोलिसांनी...
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 9:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापूर ते मुंबई प्रवास होणार सोयीचा; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, 20 विशेष फेऱ्या जाहीर, जाणून घ्या थांबे आणि वेळ