'बिंग फुटणार अन् लफडं जगाला कळणार', या भीतीने पोलीस भरती अकॅडमीच्या संचालकाचा मोठा कांड, पण पोलिसांनी...

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar : सिल्लोड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःचे प्रेमप्रकरण उघड होऊ नये म्हणून शहरातील एका पोलीस भरती प्रशिक्षण अकॅडमीच्या संचालकाने...

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : सिल्लोड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःचे प्रेमप्रकरण उघड होऊ नये म्हणून शहरातील एका पोलीस भरती प्रशिक्षण अकॅडमीच्या संचालकाने आपल्याच विद्यार्थ्यांचे अपहरण केले. ही घटना शनिवारी दुपारी 2:30 वाजता घडली. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नेमके घडले काय?
सिल्लोडच्या 'हिंदवी करिअर अकॅडमी'मध्ये 20 वर्षीय अमोल गजानन मक हा तरुण गेल्या एक वर्षांपासून पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होता. अकॅडमीचा संचालक दशरथ जाधव याचे अकॅडमीतील एका प्रशिक्षणार्थी मुलीवर प्रेम जडले. या प्रेमप्रकरणात जाधव अमोलचा वापर करत होता, पण दोघांमध्ये बिनसल्याने जाधवने अमोलला अकॅडमीतून काढून टाकले.
जाधव आणि त्या मुलीच्या प्रेमप्रकरणाचे व्हॉइस रेकॉर्डिंगचे पुरावे अमोलकडे होते. हे पुरावे व्हायरल झाले तर आपले बिंग फुटेल या भीतीने दशरथ जाधवने अमोलच्या अपहरणाचा कट रचला. त्याने अकॅडमीतील दोघा मुलांना दुचाकीवरून केळगावात पाठवले आणि अमोलला घाटात बोलावले. तेथे दबा धरून बसलेल्या जाधव आणि त्याच्या मित्रांनी अमोलला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली आणि पुराव्यांची मागणी केली. अमोलने पुरावे देण्यास नकार दिल्यावर त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण केले.
advertisement
'फिल्मीस्टाईल' पाठलाग आणि अटक
अमोलचे अपहरण करून त्याला सिल्लोडकडे घेऊन जात असताना, त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला कारमध्ये पाहिले. त्याने तात्काळ सिल्लोड ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने भराडीजवळ सापळा रचला आणि चित्रपटातल्या पाठलागाप्रमाणे धावपळ करत चारही आरोपींना रंगेहात पकडले. अमोल मक याच्या फिर्यादीवरून दशरथ विठ्ठल जाधव (संचालक, हिंदवी करिअर ॲकॅडमी, सिल्लोड), गणेश कृष्णा जगताप (मित्र, रा. वडोदचाथा), गणेश सोनुसिंग चव्हाण आणि प्रवीण लालचंद राठोड (दोघेही रा. कोहाळातांडा) या चार जणांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
'बिंग फुटणार अन् लफडं जगाला कळणार', या भीतीने पोलीस भरती अकॅडमीच्या संचालकाचा मोठा कांड, पण पोलिसांनी...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement