advertisement

Pune Gang War : गजा मारणे तुरूंगाबाहेर येताच बंडू आंदेकरला धुळ्याला हलवलं, पुण्यात नेमकं काय घडलं?

Last Updated:

Bandu Andekar was shifted to Dhule : गुंड गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर करताच पुणे शहरात पुन्हा एकदा या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Bandu Andekar was shifted to Dhule
Bandu Andekar was shifted to Dhule
Pune Crime News : पुण्यातील गणेश पेठेतील मासळी बाजारात व्यापाऱ्यांकडून कथित 'प्रोटेक्शन मनी'च्या नावाखाली खंडणी उकळल्याच्या गंभीर आरोपाखाली अटकेत असलेल्या दोन आरोपींना आता कोर्टाने मोठा झटका दिला आहे. या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू झाली असून, त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. काल गजा मारणे याला जामीन मंजूर झाल्यानंतर आता आंदेकर टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. आंदेकर टोळीची धुळ्याला रवानगी करण्यात आली आहे.

बंडू आंदेकरला न्यायालयीन कोठडी सुनावली

आंदेकर टोळीच्या 'प्रोटेक्शन मनी' प्रकरणी गुंड बंडू आंदेकर आणि त्याचा पुतण्या शिवम आंदेकर यांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवार, 28 नोव्हेंबरला संपल्यामुळे त्यांना न्यायमूर्ती एस. आर. साळुंखे यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. येथे 'मकोका' (MCOCA) न्यायालयाचे विशेष न्यायाधीश साळुंखे यांनी सुनावणीनंतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
advertisement

गजानन मारणेला जामीन मंजूर

गुंड गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर करताच पुणे शहरात पुन्हा एकदा या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. फिर्यादी देवेंद्र जोग यांनी न्यायालयात हजर राहून कुणीही चिथावणी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. विशेष न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जात-मूचलक्यावर जामीन मंजूर केला. जेलमधून जामिनावर सुटका होताच गजानन मारणे थेट पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल झाला आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त यांच्या समोर हजेरी लावली.
advertisement

पुण्याजवळील धुळे कारागृहात रवानगी

दरम्यान, न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे आता गुंड बंडू आंदेकर आणि शिवम आंदेकर यांचा मुक्काम पुण्याजवळील धुळे कारागृहात असणार आहे. या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील विलास पटारे यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर, आरोपींच्या वतीने अॅड. मिथुन चव्हाण, अॅड. एएस धीवर आणि अॅड. गणेश माने यांनी त्यांची बाजू मांडली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Gang War : गजा मारणे तुरूंगाबाहेर येताच बंडू आंदेकरला धुळ्याला हलवलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement