advertisement

ते आले, सिगरेट घेतली अन् कोयता काढून...पुण्यातील पान टपरीवरील घटनेचा थरकाप उडवणारा Video

Last Updated:

विमाननगर परिसरात सिगारेट फुकट देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून पाच ते सहा तरुणांच्या टोळक्याने एका पान टपरीवर कोयत्याने हल्ला करत तोडफोड केली आहे.

पुण्यात कोयता गँगची दहशत
पुण्यात कोयता गँगची दहशत
अभिजित पोते, पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात 'कोयता गँग'ची दहशत पुन्हा एकदा उघड झाली आहे. विमान नगर परिसरात सिगारेट फुकट देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून पाच ते सहा तरुणांच्या टोळक्याने एका पान टपरीवर कोयत्याने हल्ला करत तोडफोड केली आहे. या घटनेनंतर स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसंच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुकट वस्तू मिळवण्याच्या उद्देशाने आलेल्या पाच ते सहा जणांच्या या टोळक्याने दुकानदाराकडे मोफत सिगारेटची मागणी केली. दुकानदार त्यांच्याशी बोलत असतानाच, टोळक्यातील एका आरोपीने अचानक कोयता बाहेर काढून दुकानात तोडफोड करण्यास सुरुवात केली. हा संपूर्ण थरार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, मात्र याची पर्वा न करता हल्लेखोरांनी आपला हल्ला सुरूच ठेवला.
advertisement
विशेष म्हणजे, या हल्लेखोरांमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. भरदिवसा अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे विमाननगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे पुणे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिक या गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
advertisement
फुरसुंगीमध्येही तोडफोड
4-5 दिवसांआधीच फुरसुंगीमध्येही एक घटना समोर आली होती. यात टोळक्यांनी हातामध्ये कोयता घेऊन २५ ते ३० वाहनांची तोडफोड केली. फुरसुंगीतील हांडेवाडीमधील आदर्शनगरमध्ये ही घटना घडली होती. कोयता गँगने रिक्षा, कारची तोडफोड केली. ही तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. कोयता गँगने घोषणाबाजी करत वाहनांची तोडफोड केली. दहशत माजवण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केलं.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
ते आले, सिगरेट घेतली अन् कोयता काढून...पुण्यातील पान टपरीवरील घटनेचा थरकाप उडवणारा Video
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement