advertisement

संसारात 'तिसरी'ची एन्ट्री, पतीनं स्टेटसवरही बिनधास्त टाकले फोटो; पुण्यातील पत्नीने अशी घ़डवली अद्दल की सगळीकडे चर्चा

Last Updated:

कायदेशीर पत्नी घरात असताना दुसरे लग्न करणे आणि त्याचे सोशल मीडियावर प्रदर्शन करणे एका पतीला चांगलेच महागात पडले आहे

पतीने केलं दुसरं लग्न (AI Image)
पतीने केलं दुसरं लग्न (AI Image)
पुणे : कायदेशीर पत्नी घरात असताना दुसरे लग्न करणे आणि त्याचे सोशल मीडियावर प्रदर्शन करणे एका पतीला चांगलेच महागात पडले आहे. दुसऱ्या पत्नीसोबतचे फोटो आणि स्टेटस अपडेट करून पहिल्या पत्नीचा मानसिक छळ करणाऱ्या पतीसह तब्बल १० जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील 'दुसरी पत्नी' सध्या जिल्हा परिषद निवडणुकीत एका राष्ट्रीय पक्षाकडून नशीब आजमावत असून, या गुन्ह्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
नेमका प्रकार काय?
पीडित महिलेचा सिद्धेश्वर नामदेव काळभोर यांच्याशी रीतसर विवाह झाला होता. मात्र, हे वैवाहिक नाते अस्तित्वात असतानाच सिद्धेश्वर यांनी एका महिलेशी दुसरे लग्न केले. धक्कादायक बाब म्हणजे, हे लग्न लपवून न ठेवता पती आणि त्याच्या नातेवाईकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा उघड प्रचार सुरू केला. पूनम गायकवाड यांच्या नावापुढे पतीचे नाव लावून फोटो, स्टेटस आणि पोस्ट अपलोड करण्यात आल्या, ज्यामुळे पहिल्या पत्नीची सामाजिक बदनामी झाली.
advertisement
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती सिद्धेश्वर आणि दुसरी पत्नी यांनी तिला अश्लील मेसेज करून मानसिक त्रास दिला. इतकेच नाही तर जिल्हा परिषदेच्या प्रचारादरम्यान पूनम या सिद्धेश्वर यांच्या पत्नी असल्याचं सांगच प्रचार घरोघरी जाऊन करण्यात आला. ठिकठिकाणी लावलेले फ्लेक्स आणि व्हॉट्सॲप स्टेटस पाहून पीडितेच्या दोन मुलांच्या मनावरही गंभीर परिणाम झाला. अखेर या छळाला कंटाळून पत्नीने कायद्याचा आधार घेत पतीला आणि सासरच्यांना धडा शिकवला आहे.
advertisement
१० जणांवर गुन्ह्याची टांगती तलवार
लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणी पती सिद्धेश्वर काळभोर, दुसरी पत्नी, दीर, जाऊ आणि मावशीसह १० नातेवाईकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत हा प्रकार उघड झाल्याने राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली असून, जिल्हा परिषद उमेदवाराच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
संसारात 'तिसरी'ची एन्ट्री, पतीनं स्टेटसवरही बिनधास्त टाकले फोटो; पुण्यातील पत्नीने अशी घ़डवली अद्दल की सगळीकडे चर्चा
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement