Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर काही मिनिटांत, मेट्रो 3 कधी धावणार, कुठं थांबणार? महत्त्वाचं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune Metro 3: हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील बहुप्रतिक्षित पुणे मेट्रो लाईन 3 ची पहिली ट्रायल रन यशस्वीपणे पार पडली आहे.
पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित असणारी हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील पुणे मेट्रो लाईन 3 ची पहिली ट्रायल रन यशस्वीपणे पार पडली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रत्यक्ष मेट्रोसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. येत्या काही दिवसांत पुढील प्रक्रिया पूर्ण करून ही सेवा नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे.
हिंजवडी हा भाग आयटी हब म्हणून ओळखला जातो. याठिकाणी अनेक कंपन्या आहेत. त्यामुळे या परिसरात वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. या मेट्रोसेवेमुळे काही प्रमाणात वाहतूककोंडी कमी होण्याची शक्यता आहे.
लवकरच मेट्रो पुणेकरांच्या सेवेत
पुणे मेट्रो लाईन 3 हा हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान धावणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गाची एकूण लांबी सुमारे 23.203 किलोमीटर असून संपूर्ण मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) स्वरूपाचा आहे. या लाईनवर एकूण 23 स्थानके उभारण्यात येत आहेत, ज्यामुळे आयटी हब असलेल्या हिंजवडीसह अनेक भाग जोडले जाणार आहेत.
advertisement
हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येत असून, अशा प्रकारचा हा देशातील पहिल्यांदाच उभारला जाणारा मेट्रो प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 8,313 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मेट्रोसेवेमुळे प्रवास आता अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. तसेच प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगरचा मेट्रो स्टेशन
पुणे मेट्रो लाईन 3 वर एकूण 23 स्टेशन्स उभारण्यात येत आहेत. ही स्टेशन्स शहरातील महत्त्वाच्या भागांना जोडणार आहेत. या मार्गावर प्रवास मेगापॉलिस सर्कलपासून सुरू होईल. त्यानंतर एम्बेसी क्वाड्रोन बिजनेस पार्क, डोहलेर, इन्फोसिस फेज 2, विप्रो फेज 2, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, आणि वाकड चौक अशी महत्त्वाची आयटी क्षेत्रातील स्टेशन्स येतील.
advertisement
पुढे बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर, रामनगर, लक्ष्मी नगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसंधान, सकाळ नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरबीआय, ॲग्रिकल्चर कॉलेज, शिवाजीनगर, आणि शेवटी सिव्हिल कोर्ट या प्रमुख ठिकाणी स्टेशनचा समावेश असणार आहे. येत्या काही दिवसांत पुढील प्रक्रिया पार पडल्यानंतर मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 12:54 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर काही मिनिटांत, मेट्रो 3 कधी धावणार, कुठं थांबणार? महत्त्वाचं अपडेट









