advertisement

Pune Metro: वाहतूक कोंडी विसरा! आता पुण्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सुसाट प्रवास; मेट्रो 4 बाबत मोठी अपडेट

Last Updated:

महाराष्ट्र सरकारने हडपसर ते खडकवासला (मार्गिका क्र. ४) आणि वनाझ ते रामवाडी मार्गिकेचा विस्तार असलेल्या माणिकबाग ते नळस्टॉप या उपमार्गिकेला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.

मेट्रो 4 बाबत मोठी अपडेट (फाईल फोटो)
मेट्रो 4 बाबत मोठी अपडेट (फाईल फोटो)
पुणे: पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत क्रांती घडवून आणणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. महाराष्ट्र सरकारने हडपसर ते खडकवासला (मार्गिका क्र. ४) आणि वनाझ ते रामवाडी मार्गिकेचा विस्तार असलेल्या माणिकबाग ते नळस्टॉप या उपमार्गिकेला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे सिंहगड रस्ता, सोलापूर रस्ता आणि हडपसर परिसरातील भीषण वाहतूक कोंडी फुटण्यास मोठी मदत होणार आहे.
प्रकल्पाचे स्वरूप आणि खर्च
केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२५ मध्ये या मार्गांना हिरवा कंदील दाखवला होता. आता राज्याच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
हडपसर ते खडकवासला: २५.५ कि.मी. अंतराच्या या मार्गावर २२ स्थानके असतील. तर, माणिकबाग ते नळस्टॉ या ६.१२ कि.मी.च्या या उपमार्गिकेवर ६ स्थानके असणार आहेत. या दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण ९,८५७.८५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी १,२१२ कोटींचा निधी देणार असून, उर्वरित ४,६९४ कोटी रुपये कर्जाच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत.
advertisement
वाहतूक कोंडीतून मुक्तता
या नवीन मार्गिकांमुळे पुण्यातील सर्वात गजबजलेल्या परिसरांना मोठा फायदा होणार आहे
सिंहगड रस्ता: माणिकबाग ते नळस्टॉप जोडणीमुळे सिंहगड रस्त्यावरील नोकरदारांचा प्रवास जलद होईल.
हडपसर व सोलापूर रस्ता: हडपसर ते खडकवासला मार्गिकेमुळे पूर्व आणि पश्चिम पुणे मेट्रोने जोडले जाईल.
प्रशासकीय वेग: राज्य सरकारने महामेट्रो आणि केंद्र सरकारसोबत सामंजस्य करार करण्यासही मान्यता दिली असून, लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: वाहतूक कोंडी विसरा! आता पुण्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सुसाट प्रवास; मेट्रो 4 बाबत मोठी अपडेट
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement