सकाळी सकाळी आला मेल; पुण्यातील या महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी, 'त्या' 2 नावांच्या अजब अटीमुळे उडाली खळबळ, पण...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
दोन व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करून, त्यांना दुपारी १ वाजेपूर्वी कामावरून काढून टाका, असा इशारा देण्यात आला होता. जर या अटीचे पालन झाले नाही, तर संपूर्ण कार्यालय बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी या मेलमध्ये देण्यात आली होती.
पुणे : पुण्यातील बाणेर येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला गुरुवारी सकाळी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. एका निनावी ई-मेलद्वारे मिळालेल्या या धमकीमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र तातडीने केलेल्या तपासात हा प्रकार खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नेमकी धमकी काय होती?
गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पासपोर्ट कार्यालयाला एक ई-मेल प्राप्त झाला. यामध्ये दोन व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करून, त्यांना दुपारी १ वाजेपूर्वी कामावरून काढून टाका, असा इशारा देण्यात आला होता. जर या अटीचे पालन झाले नाही, तर संपूर्ण कार्यालय बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी या मेलमध्ये देण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे, या ई-मेलमध्ये खलिस्तान, काश्मीर आणि दहशतवाद यांसारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला होता.
advertisement
पोलिसांची तत्परता आणि 'सस्पेन्स'
धमकी मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाने (BDDS) घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण इमारतीची कसून तपासणी केली. मात्र, तपासात कोणतीही संशयास्पद किंवा स्फोटक वस्तू आढळली नाही. दरम्यान, प्रशासनाने जेव्हा मेलमधील नावांची तपासणी केली, तेव्हा त्या नावाच्या कोणत्याही व्यक्ती या कार्यालयात कार्यरतच नसल्याचे समोर आले.
advertisement
ई-मेलमधील मजकूर अत्यंत विस्कळीत, अवास्तव आणि संशयास्पद असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी किंवा वैयक्तिक रागातून कोणीतरी हा मेल पाठवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून सायबर पोलीस या ई-मेलच्या 'आयपी ॲड्रेस'चा शोध घेत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 6:49 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सकाळी सकाळी आला मेल; पुण्यातील या महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी, 'त्या' 2 नावांच्या अजब अटीमुळे उडाली खळबळ, पण...






