advertisement

पुण्यातील वर्दळीच्या रस्त्यावर संशयास्पदरित्या उभी होती महिला; पर्स तपासताच पोलीस चक्रावले, लगेचच घेतलं ताब्यात

Last Updated:

सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या एका महिलेची पोलिसांनी झडती घेतली असता, तिच्याकडे विक्रीसाठी आणलेला 'गांजा' सापडला.

महिलेकडे आढळला गांजा (AI Image)
महिलेकडे आढळला गांजा (AI Image)
पिंपरी-चिंचवड : पिंपरी येथील संत तुकारामनगर परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या एका महिलेची पोलिसांनी झडती घेतली असता, तिच्याकडे विक्रीसाठी आणलेला 'गांजा' सापडला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली असून, तिला हा गांजा पुरविणाऱ्या तिच्या पतीवरही गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी कारवाई काय?
शनिवारी (२१ फेब्रुवारी) दुपारी संत तुकारामनगरमधील गांधीनगर भागात ही घटना घडली. पिंपरी-चिंचवड पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक या परिसरात गस्तीवर असताना, त्यांना एक महिला सार्वजनिक जागेत बराच वेळ संशयास्पदरित्या उभी असल्याचे दिसले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी महिला अंमलदारांच्या मदतीने तिची तपासणी केली.
महिलेजवळ असलेल्या बॅगची झडती घेतली असता, त्यात विक्रीसाठी आणलेला गांजा आढळून आला. हे पाहून पोलीसही चक्रावले. पोलिसांनी या महिलेला तात्काळ ताब्यात घेऊन तिच्याकडील अंमली पदार्थ जप्त केले.
advertisement
पती-पत्नीवर गुन्हा दाखल
पोलिसांनी केवळ महिलेलाच नाही, तर या बेकायदेशीर व्यवसायात तिला साथ देणाऱ्या आणि गांजाचा पुरवठा करणाऱ्या तिच्या पतीवरही गुन्हा नोंदविला आहे. कालीचरण तामचीकर असे आरोपी पतीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
शहरातील गजबजलेल्या भागात अशा प्रकारे अमली पदार्थांची विक्री होत असल्याने खळबळ उडाली आहे. हे रॅकेट किती मोठे आहे आणि ते हा माल कोणाकडून आणत होते, याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील वर्दळीच्या रस्त्यावर संशयास्पदरित्या उभी होती महिला; पर्स तपासताच पोलीस चक्रावले, लगेचच घेतलं ताब्यात
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement