'तुमच्या फोनमधून अश्लील कॉल आणि व्हिडिओ...'; विचित्र भीती दाखवून पुण्यातील 79 वर्षीय वृद्धाला 36 लाखांचा गंडा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
तुमच्या मोबाईलवरून पोर्नोग्राफी केली जात आहे' अशी खोटी भीती दाखवून सायबर भामट्यांनी धायरी परिसरातील एका ७९ वर्षीय वृद्धाची तब्बल ३६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे
पुणे: पुण्यात सायबर गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. आता पुन्हा एकदा एका ज्येष्ठ नागरिकाला लक्ष्य करण्यात आले आहे. 'तुमच्या मोबाईलवरून पोर्नोग्राफी केली जात आहे' अशी खोटी भीती दाखवून सायबर भामट्यांनी धायरी परिसरातील एका ७९ वर्षीय वृद्धाची तब्बल ३६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या धक्कादायक प्रकाराबाबत नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी कशी झाली फसवणूक?
धायरीतील प्रसिद्ध डीएसके विश्व परिसरात राहणाऱ्या तक्रारदार ज्येष्ठाला ८ डिसेंबर रोजी सायबर चोरट्यांचा फोन आला. फोन करणाऱ्याने आपली ओळख 'डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया'चा अधिकारी दीपककुमार शर्मा आणि पोलीस अधिकारी संदीप राव अशी करून दिली.
"तुमच्या मोबाईल क्रमांकावरून मोठ्या प्रमाणात अश्लील कॉल्स केले जात आहेत आणि पोर्नोग्राफी पसरवली जात आहे. आमच्याकडे तुमच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत," असे सांगून आरोपींनी ज्येष्ठाला घाबरवून सोडले. ही कारवाई टाळायची असेल आणि अटकपूर्व जामीन मिळवायचा असेल, तर 'व्हेरीफिकेशन'साठी पैसे भरावे लागतील, असे भासवून त्यांना ३६ लाख रुपये विविध बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडले.
advertisement
नांदेड सिटी पोलिसांनी आवाहन केले आहे की, कोणताही सरकारी विभाग किंवा पोलीस अधिकारी पैशांची मागणी फोनवर करत नाही. तसेच, कोणालाही 'डिजिटल अरेस्ट' करण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशा प्रकारचे संशयास्पद फोन आल्यास त्वरित १९३० या सायबर क्राईम हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 1:06 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'तुमच्या फोनमधून अश्लील कॉल आणि व्हिडिओ...'; विचित्र भीती दाखवून पुण्यातील 79 वर्षीय वृद्धाला 36 लाखांचा गंडा









