advertisement

पुणे हादरलं! आईबद्दलचा तो एक शब्द ठरलं कारण! पुणे–मुंबई महामार्गालगत दगडानं ठेचून तरुणाला संपवलं

Last Updated:

पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात केवळ आईवरून दिलेल्या शिवीच्या रागातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

दगडानं डोकं ठेचून तरुणाला संपवलं (AI Image)
दगडानं डोकं ठेचून तरुणाला संपवलं (AI Image)
पुणे : मैदानावर रंगलेला क्रिकेटचा सामना आणि कट्ट्यावर बसलेले दोन अनोळखी तरुण. कोणालाही वाटलं नव्हतं की अवघ्या काही मिनिटांत तिथे रक्ताचा सडा पडेल. पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात केवळ आईवरून दिलेल्या शिवीच्या रागातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पवार आणि सनी चव्हाण हे दोघे सोमाटणे फाटा येथील जुन्या पुणे–मुंबई महामार्गालगतच्या एका मैदानात क्रिकेट सामना पाहत बसले होते. हे दोघे एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी होते आणि योगायोगाने एकाच कट्ट्यावर बसले होते. सामना पाहता पाहता त्यांच्यात कोणत्यातरी किरकोळ कारणावरून बाचाबाची सुरू झाली.
advertisement
या वादादरम्यान संतोष पवार याने आरोपी सनी चव्हाण याला आईवरून अश्लील शिवीगाळ केली. स्वतःच्या आईबद्दलचा तो एक शब्द सनीला सहन झाला नाही. संतापाने लालबुंद झालेल्या सनीने कसलाही विचार न करता तिथेच पडलेला एक मोठा दगड उचलला आणि संतोषच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. घाव इतका भीषण होता की संतोषचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
पोलिसांची तत्काळ कारवाई
भरदिवसा साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सनी चव्हाणला तातडीने ताब्यात घेतले.आईबद्दलचा अपमान काळजाला लागला आणि त्यातून एकाचा जीव गेला तर दुसऱ्याच्या हाती बेड्या पडल्या. केवळ क्षुल्लक वादातून झालेल्या या हत्येने संपूर्ण पिंपरी-चिंचवड हादरून गेले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! आईबद्दलचा तो एक शब्द ठरलं कारण! पुणे–मुंबई महामार्गालगत दगडानं ठेचून तरुणाला संपवलं
Next Article
advertisement
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल, इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल
  • 2008 पेक्षाही महाभयंकर आर्थिक संकट दारात

  • गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा

  • नव्या भविष्यवाणीने जग हादरलं

View All
advertisement