Pune Traffic: "काही रिक्षा चालक भाडं दिसलं की..." ट्रॅफिक हवालदारांनी Safe Drivingसाठी दिला थेट इशारा
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
पुण्यातील महिला ट्रॅफिक हवालदाराचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये ट्रॅफिक हवालदार प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळित ड्रायव्हिंग करण्याचं आवाहन ते दुचाकी चालकांना करताना दिसत आहे.
शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिला आहे. पुण्यातील महिला ट्रॅफिक हवालदाराचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये ट्रॅफिक हवालदार प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळित ड्रायव्हिंग करण्याचं आवाहन ते दुचाकी चालकांना करताना दिसत आहे. सध्या पुण्यामध्ये ड्रायव्हरच्या अपघातांचे प्रमाण अधिकच वाढले आहे. या विषयावर त्या महिला ट्रॅफिक हवालदाराने ड्रायव्हर्सला एक कळकळीची विनंती केली आहे, जाणून घेऊया नक्की ट्रॅफिक हवालदार काय म्हणाल्या आहेत, ते...
शितल आव्हाड नावाच्या महिला ट्रॅफिक हवालदारांनी वाहन चालकांना इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत एक कळकळीची विनंती केली आहे. महिला हवालदार व्हिडिओमध्ये म्हणतात की, "आमच्याकडे सर्वाधिक भांडणं ही रिक्षा चालकांमधील आणि इतर वाहनांमधील येतात. काही रिक्षा चालक व्यवस्थित नियमांचं काटेकोरपणे पालन करून आपलं वाहन चालवत असतात, पण काही रिक्षा चालक भाडं दिसलं की, रस्त्यावरच डायरेक्ट गाडी थांबवतात किंवा पटकन रिक्षा वळवतात. त्यामुळे रस्त्यावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे रस्त्यावरच ड्रायव्हरमध्ये वाद होतात."
advertisement
"त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. पोलिस चौकीच्याच बाहेर लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. उगाचच वाद होण्यापेक्षा आधीपासूनच रिक्षा चालकांनी सुरळीत ड्रायव्हिंग करावी, भांडणं करू नका." असं या व्हिडिओमध्ये ट्रॅफिक हवालदार म्हणतायत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकदा वाहतूक विभागाकडून ड्रायव्हर्सला व्यवस्थित वाहन चालवण्याचे आवाहन केले जाते. जनजागृती केली जाते, पोस्टर्सच्या माध्यमातूनही ड्रायव्हिंग बद्दल जनजागृती केली जाते. असं असलं तरीही ड्रायव्हर्स शेवटी जी चूक करायची ती चूक करतातच.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 18, 2025 5:27 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: "काही रिक्षा चालक भाडं दिसलं की..." ट्रॅफिक हवालदारांनी Safe Drivingसाठी दिला थेट इशारा