advertisement

Pune News: महिलांनो, लग्नात सोन्याचे दागिने घालून जात असाल तर सावधान! पुण्यातून चोरीची धक्कादायक घटना समोर

Last Updated:

सध्या लग्नसराईचे दिवस असून मंगल कार्यालयांमध्ये लोकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत चोरटे सक्रिय झाले आहेत

लग्नात दागिने चोरी (AI Image)
लग्नात दागिने चोरी (AI Image)
पुणे: सध्या लग्नसराईचे दिवस असून मंगल कार्यालयांमध्ये लोकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत चोरटे सक्रिय झाले आहेत. पुण्यातील क्वीन्स गार्डन परिसरातील एका नामांकित मंगल कार्यालयातून एका ५० वर्षीय महिलेचे १ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी शिताफीने लांबवले आहे. या घटनेमुळे लग्नकार्यात दागिने सांभाळणे आता मोठे आव्हान ठरत आहे. सोन्याच्या किमती प्रचंड वाढलेल्या असताना अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्येही मोठी वाढ होताना दिसत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेली माहिती अशी की, कोथरूड भागात राहणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेच्या नात्यातील विवाह समारंभ ५ फेब्रुवारी रोजी क्वीन्स गार्डन येथील 'डच पॅलेस' मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या समारंभासाठी नटून-थटून आलेल्या महिलेने आपले सोन्याचे मंगळसूत्र काही काळासाठी पर्समध्ये ठेवले होते. लग्नकार्यातील घाईगडबडीचा आणि गर्दीचा फायदा घेत चोरट्याने नजर चुकवून मंगळसूत्र असलेली ही पर्सच गायब केली.
advertisement
पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. डच पॅलेस कार्यालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज सध्या पोलीस तपासत आहेत. संशयित हालचाली करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात असून, पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: महिलांनो, लग्नात सोन्याचे दागिने घालून जात असाल तर सावधान! पुण्यातून चोरीची धक्कादायक घटना समोर
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement