जिला नगरसेवक बनवायचं होतं, तिनेच घेतला जीव, पुण्यात मध्यरात्री सामाजिक कार्यकर्त्याची निर्घृण हत्या
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Pimpri Chinchwad: पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवड परिसरात मध्यरात्री दोनच्या सुमारास कौटुंबिक वादातून एका सामाजिक कार्यकर्त्याचा निर्घृण खून झाला आहे.
गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड: पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास कौटुंबिक वादातून एका सामाजिक कार्यकर्त्याचा निर्घृण खून झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा खून अन्य कोणी नव्हे, तर संबंधित सामाजिक कार्यकर्त्याच्या पत्नीनेच केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला तत्काळ ताब्यात घेतलं असून तिची कसून चौकशी सुरू आहे.
नेमकी घटना काय आहे?
या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव नकुल भाईर असं आहे. नकुल भाईर हे परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते. पिंपरी चिंचवड भागात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. नकुल भोईर हे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी आणि विविध सामाजिक चळवळीत सक्रिय होते. चिंचवडगाव आणि शहरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी आग्रही असायचे. अशा सामाजिक कार्यकर्त्याची मध्यरात्री अचानक हत्या झाल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चिंचवड परिसरातील त्यांच्या राहत्या घरी घडली. नकुल भाईर यांचा खून अतिशय निर्घृणपणे करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.
विशेष म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या पत्नीने नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी, यासाठी नकुल यांनी मोठी तयारी केली होती. जिला नगरसेवक बनवायचं होतं. त्याच पत्नीने नकुल यांची हत्या केली आहे.
advertisement
कौटुंबिक वादातून हत्या
प्राथमिक तपासानुसार, नकुल भाईर आणि त्यांची पत्नी चैताली भाईर यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू होते. रात्री उशिरा नकुल आणि त्यांची पत्नी यांच्यात पुन्हा वाद झाले आणि रागाच्या भरात पत्नी चैतालीने कापड्याने गळा आवळून नकुलचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सध्या चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी चैताली भाईरला तत्काळ ताब्यात घेतले असून, तिची कसून चौकशी सुरू आहे. नेमका वाद कोणत्या कारणावरून विकोपाला गेला, याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत.
view commentsLocation :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
October 24, 2025 9:04 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
जिला नगरसेवक बनवायचं होतं, तिनेच घेतला जीव, पुण्यात मध्यरात्री सामाजिक कार्यकर्त्याची निर्घृण हत्या


