कारमधून आले अन् लाखो रुपयांचा ऐवज घेऊन गेले, पुण्यात सराफ दुकानावर दरोडा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
शिरूरच्या अमोल ज्वेलर्समध्ये चार चोरट्यांनी पहाटे लाखो रुपयांचे सोने चांदी चोरी केले. पोलिसांनी तपास सुरू केला असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सचिन तोडकर, प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एका सराफ दुकानावर डल्ला मारत लाखो रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील सरदार पेठेतील अमोल ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान चार चोरट्यांनी फोडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरटे एका कारमधून आले होते. त्यांनी पहाटेच्या वेळी शांततेचा फायदा घेत दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील सोने आणि चांदीचे लाखो रुपयांचे दागिने त्यांनी चोरून नेले.
घटनेची माहिती मिळताच शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शिरूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 24, 2025 11:34 AM IST