Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर तयार होणार वीज, MSRDC ने तयार केलाय प्लॅन; कसा असेल प्रोजेक्ट

Last Updated:

Samruddhi Mahamarg Solar Energy Project Details : समृद्धी महामार्गावर MSRDC नवीन सौर वीज प्रकल्प राबवणार आहे. चला तर जाणून घ्या या बाततची सविस्तर माहिती.

News18
News18
मुंबई : पहिल्यांदाच समृद्धी महामार्गावर MSRDC ने एक नवीन प्रकल्प सुरु केला आहे. ज्यामध्ये सौर उर्जा निर्माण केली जात आहे. समृद्धी महामार्गावरील इंटरचेंजेसवर 204 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प चालू आहेत. सोमवारी सुमारे 5 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण झाली, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सौर ऊर्जा निर्माणामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला टोलशिवाय आणखी एक उत्पन्न मिळेल.
नेमका फायदा काय?
कॉर्पोरेशनमधील सूत्रांनी सांगितले की, तयार झालेली सौर उर्जा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकमधील बागदे तसेच समृद्धी महामार्गावरील काही बोगद्यांमद्ये दिवे चालवण्यासाठी वापरली जाईल. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणारा समृद्धी महामार्गा हा नागपूर आणि मुंबईला जोडतो आणि हा तब्बल 701 किमी लांबीचा एक्सप्रेसवे आहे. ज्यावर आतापर्यंत 1.25 कोटीहून अधिक वाहनं प्रवास करीत असतात.
advertisement
MSRDC च्या अधिकाऱ्यांनी सांगितले,समृद्धी महामार्गाच्या नियोजनापासूनच आम्ही जलद प्रवासासोबत सौर उर्जा निर्मितीचा उद्देश ठेवला होता आणि आता त्यानुसार पहिल्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंजेसवर 9 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी कारंजा लाड येथे 3 मेगावॅट आणि मेहकर येथे 2 मेगावॅट वीज निर्मिती सुरू झाली आहे.
advertisement
MSRDC चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदाल यांनी सांगितले, हा आमच्या कॉर्पोरेशनसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. सौर उर्जा प्रकल्प फक्त समृद्धी महामार्गावरच नव्हे तर अन्य प्रस्तावित एक्सप्रेसवेच्या इंटरचेंजेसवरही राबविण्याचे योजना आहे.
सौर उर्जा प्रकल्पाचा वीज वापर 2022 मध्ये MSRDC च्या विशेष उपक्रम कंपनी महासमृद्धी रिन्युएबल एनर्जी लि. आणि MSEDCL यांच्यात झालेल्या करारानुसार केला जाईल. मुख्यमंत्री सौर कृषी फ्रीडर योजनेत सहभागी होऊन टेंडर प्रक्रियेद्वारे प्रतियुनिट सुमारे 3 रुपये 0 पैसे दराने वीज खरेदी केली जाईल.
advertisement
कॉर्पोरेशन भविष्यात पवन ऊर्जा निर्मितीचेही प्रयोग करत आहे. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यांनुसार भविष्यात सौर पॅनेल्ससह पवन चक्क्याही लावल्या जातील. यामुळे नैसर्गिक वाऱ्याचा वेग तसेच एक्सप्रेसवेवरून वाहनांच्या गतीमुळे निर्माण होणारा ड्राफ्ट याचा फायदा होईल. सौर पॅनेल्स महामार्गाच्या कडेला आणि वापर नसलेल्या जमिनीवर बसवले जातील, ज्यामुळे सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग होईल. उदा. नागपूर ते मुंबईच्या मार्गाचा डाव्या बाजूचा भाग दक्षिणेकडे आहे, ज्यामुळे वीज निर्मितीसाठी सर्वाधिक सूर्यप्रकाश मिळतो.
advertisement
या उपक्रमामुळे MSRDC ना फक्त अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळेल शिवाय पर्यावरणीय फायदेही होणार आहेत. वीज निर्मितीद्वारे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नवीन संधी निर्माण होतील. या योजनेतून भविष्यात इतर एक्सप्रेसवेवरही सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याची दृष्टी ठेवलेली आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील वाहतूक आणि ऊर्जा क्षेत्रात एकत्रित विकास साधता येईल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर तयार होणार वीज, MSRDC ने तयार केलाय प्लॅन; कसा असेल प्रोजेक्ट
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement