फक्त 40 सेकंदात तोंडपाठ सांगितली आफ्रिका खंडातील 53 आफ्रिकन देशांची नावे, पुण्यातील 2 वर्षांचा हा चिमुकला आहे तरी कोण?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
युरोपीयन देशा बरोबर आफ्रिकन देशाची नाव ही येतात आणि जपनीस फ्रुट, नंबर ही येतात.40 सेकंदात आफ्रिका खंडातील 53 अफ्रिकन देशांच नावे ही सांगतो.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : आतापर्यंत विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपल्या नावावर वेगवेगळे विक्रम केले आहेत. कौशल्य आणि बुद्धीचातुर्याच्या बळावर त्यांनी आपल्या नावावर अनोखे विक्रम केले. पण एका दोन वर्षांच्या चिमुकल्यानेही आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर एक मोठा विक्रम केला आहे. हा चिमुकला नेमका कोण आहे, त्याने नेमका काय विक्रम केला आहे, हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
रिषीत सागर बाफना असे या चिमुकल्याचे नाव आहे. या चिमुकल्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर 40 सेकंदात आफ्रिका खंडातील 53 अफ्रिकन देशांच नावे सांगत ओ. एम. जी. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली. त्याला ही अफाट बुद्धिमत्ता कशी साधता आली, याबद्दल त्याच्या पालकांनी लोकल18 शी बोलताना माहिती दिली.
कोरोनाकाळात नोकरी गेली, गावी परतून सुरू केला व्यवसाय, आज महिन्याला तब्बल इतक्या रुपयांची उलाढाल
पुणे शहरातील मार्केट यार्ड परिसरातील वास्तव्यास असलेले बाफना कुटुंबीय आहेत. एवढ्या लहान वयात विश्वविक्रम स्थापन करण्यात रिषीतची आई दिशा आणि वडिलांच मोठ योगदान आहे. जागतिक पातळीवरील ओ. एम. जी. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये सहभागी होण्यासाठी रिषीतच्या पालकांनी संस्थेच्या वेबसाइटवर 6 महिन्यांपुर्वी नोंद केली होती. यादरम्यान, 19 एप्रिल रोजी ओ. एम. जी.च्या पथकाने रिषीतची दृक-श्राव्य मुलाखत घेतली. यात त्याने 53 आफ्रिकन देशांची नावे अवघ्या 40 सेकंदात सांगितली.
advertisement
यानंतर ओ. एम. जी. च्या वरिष्ठ पातळीवर हे व्हिडिओ चित्रीकरण पाठविण्यात आले. समितीने परिक्षणाअंती रिषीत बाफना याची ओ. एम. जी. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् -2024 मध्ये नोंद केली.
रिषीतची आई दिशा बाफना यांनी यावेळी सांगितले की, रिषीतला पुस्तकांची आवड आहे आणि त्याची ग्रास्पिंग पॉवरही जास्त होती. मग त्याला फ्लॅश कार्ड दाखवायला सुरुवात केली. त्याच्याकडून हे सगळं रोज म्हणून घ्यायचे. असे प्रत्येक दिवशी 4 देशाची नाव शिकवत 53 देशाची नाव पाठ करून घेण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी लागला.
advertisement
यानंतर त्याचे काही व्हिडिओ करून वेळेवर काम केले. त्यानंतर त्याचा हा रेकॉर्ड झाला आहे. आम्ही आता त्याला भारतातील राज्य यावर त्याची तयार करून त्यामध्ये काही तरी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्याला आशियाई देशांबरोबर आफ्रिकन देशाची नावेही येतात. जपनीस फ्रुट नंबरही येतात, अशी माहिती रिषीतची आई दिशा बाफना यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 18, 2024 12:34 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
फक्त 40 सेकंदात तोंडपाठ सांगितली आफ्रिका खंडातील 53 आफ्रिकन देशांची नावे, पुण्यातील 2 वर्षांचा हा चिमुकला आहे तरी कोण?