Astrology: खूप कष्ट सोसलं, अक्षय तृतीयेला दिवस बदलणार, या 5 राशींना अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार

Last Updated:

Astrology: यंदाच्या अक्षय तृतीयेला वृषभ, मिथुनसह 5 राशींचा भाग्योदय होणार आहे. नाशिकच्या ज्योतिषाचार्यांनी याबाबत माहिती दिलीये.

+
Astrology:

Astrology: खूप कष्ट सोसलं, आता दिवस बदलणार, अक्षय तृतीयेला या 5 राशींना हवं ते मिळणार

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक: हिंदू सनातन धर्मात अक्षय्य तृतीयेच्या सणाला धार्मिक महत्त्व आहे. हिंदू पंचांगनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया म्हणतात. शास्त्रांमध्ये या तिथीला अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलंय. साडेतीन मुहुर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी आवर्जून नवीन वस्तू, वास्तू, सोनं खरेदी केलं जातं.
advertisement
ज्योतिषशास्त्रात देखील अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला अत्यंत शुभ मानलं गेलंय. या दिवशी घेतलेलं धन हे अक्षय्य राहतं अशी मान्यता आहे. यंदा देखील अक्षय तृतीयेचा मुहूर्त काही राशींसाठी अत्यंत सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे. 5 राशींवर लक्ष्मी आणि कुबेराची एकत्रित कृपा होणार आहे. याबाबतच नाशिक येथील ज्योतिषी अमोघ पाडळीकर यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
वृषभ 
ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा सण खूप महत्त्वाचा, शुभ आणि समृद्धी देणारा ठरणार आहे. आर्थिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये विशेष लाभ मिळतील. नोकरी आणि व्यवसायात यश प्राप्त होणार आहे. पैसे गुंतवण्यासाठी हा तुमच्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. तुमच्या संपत्तीत अनेक पटीने वाढ होईल. तसेच हा प्रगतीचा काळ असणार आहे. तुमच्या कारकिर्दीला अचानक चालना मिळू शकते.
advertisement
मिथुन 
यंदा अक्षय तृतीयेला मिथुन राशीला देखील चांगले दिवस येणार आहे. मागच्या काळात मिथुन राशीला अनेक कष्ट सोसावे लागले. परंतु या अक्षय तृतीयेपासून मिथुन राशीच्या लोकांचा भाग्योदय होणार आहे. चांगले फळ मिळणार आहे. कला तसेच आवडता छंद यातून विद्यार्थ्यांना बौद्धिक फायदा होणार आहे. आजवर केलेले प्रयत्न आता चांगलं फळ देतील.
advertisement
कन्या 
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कन्या राशीला स्पर्धात्मक यश प्राप्त होईल. लग्नासाठी इच्छुक असलेल्यांसाठी हा चांगला काळ आहे. आर्थिक योग वाढतील आणि नवीन यशाचे मार्ग सापडणार आहेत.
धनु 
या राशीच्या लोकांचा हा चांगला काळ असणार आहे. आपल्या कामात लोक भरपूर नफा मिळवणार आहेत. पैसे कमविण्याचे मार्ग मोकळे होतील. मात्र ह्या राशीच्या लोकांनी जरा सावधगिरी बाळगणी गरजेची आहे. तसेच शब्द जपून वापरणे, वादविवाद टाळणे गरजेचे आहे.
advertisement
कुंभ 
राशीच्या लोकांना विशेष शनि महाराजांची चांगली दृष्टी प्राप्त होणार आहे. या राशीच्या लोकांमध्ये प्रगतीचा काळ जाणवत आहे. तसेच काही जुनी कामे देवाण घेवाण या काळात पूर्णपणे पार पडतील. घरातील वातावरण हे आनंदी राहील. तसेच कामाच्या चांगल्या संधी उपलब्ध होणार आहे. व्यावसायिकांना अनपेक्षित वाढ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला यश मिळेल आणि अचानक तुम्हाला कुठूनतरी तुमच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Astrology: खूप कष्ट सोसलं, अक्षय तृतीयेला दिवस बदलणार, या 5 राशींना अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement