स्मरणशक्ती तीव्र करण्यासाठी या गणेशमंत्राचा करा जप

Last Updated:

मंत्राचा अर्थ आणि मंत्राचा जप करण्याचे फायदे

News18
News18
मुंबई, 10 ऑगस्ट:   हिंदू धर्मात श्रीगणेशाला बुद्धीची देवता मानले जाते. प्रथम गणपतीच्या पूजेने घरात सुख, समृद्धी तर येतेच पण व्यक्तीचे व्यक्तिमत्त्वही परिपूर्ण होते. ज्योतिषी सांगतात की, श्रीगणेशाच्या मंत्राचा जप केल्याने माणसाला तल्लख बुद्धी आणि तीक्ष्ण स्मरणशक्ती मिळते. याशिवाय इतरही अनेक फायदे आहेत, जे तुम्हाला माहिती नाहीत. चला तर मग जाणून घेऊया गणेशाच्या त्या मंत्राविषयी, मंत्राचा अर्थ आणि त्या मंत्राचा जप करण्याचे फायदे.
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी सम:प्रभ:
निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा
वक्रतुंड महाकाय मंत्राचा अर्थ
वक्रतुंड महाकाय म्हणजे वक्र सोंड आणि विशाल शरीर, सूर्यकोटी समप्रभ: म्हणजे एक लाख सूर्यांच्या बरोबरीचे, निर्विघ्नम् कुरु मे देव म्हणजे कोणत्याही बाधेशिवाय आणि सर्वकार्येषु सर्वदा म्हणजे प्रत्येक कार्य शुभतेने पूर्ण होते.
advertisement
म्हणजेच या मंत्राचा अर्थ असा आहे की हे श्रीगणेशा देव ज्याची सोंड वक्र आहे, ज्याचे शरीर विशाल आहे आणि ज्याचे तेज लाखो सूर्यासारखे आहे, माझी इच्छा आहे की तू माझे सर्व कार्य कोणत्याही विघ्नाशिवाय पूर्ण होऊ दे.
हा मंत्र एकमेव असा मंत्र आहे जो कोणत्याही देवतेची पूजा, विधी, शुभ कार्य इत्यादींमध्ये नेहमी वापरला जातो. या कारणास्तव श्रीगणेशाचा हा मंत्र तारक मानला जातो.
advertisement
मंत्राचा जप करण्याचे फायदे
शास्त्रानुसार या मंत्राचे महत्त्व केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही आहे. या मंत्राचा दररोज केवळ 5 मिनिटे ध्यानासहित जप केल्यास स्मरणशक्ती तीक्ष्ण होते, असा आयुर्वेदात उल्लेख आहे.
घरात झोपाळा बांधण्याआधी जाणून घ्या वास्तूचा हा नियम, योग्य दिशा आहे महत्त्वाची
आयुर्वेदाचा असा विश्वास आहे की, या मंत्राची मूळ ऊर्जा माणसाला मानसिक रोगांपासून वाचवते आणि तणाव, नैराश्य, स्मृतिभ्रंश इत्यादी समस्यांपासून मुक्त करते.
advertisement
हा मंत्र भय, शंका, निराशा इत्यादी दुर्भावना नष्ट करतो आणि व्यक्तीच्या मन आणि मेंदूमध्ये सकारात्मकतेचा संचार करतो.
त्याचबरोबर धार्मिक दृष्टिकोनानुसार या मंत्राचा जप केल्याने गणेशासोबत माता सरस्वतीची कृपाही प्राप्त होते. तर असा हा श्रीगणेशाचा मंत्र आहे, ज्याच्या जपाने तुम्हाला तल्लख बुद्धी आणि तीक्ष्ण स्मरणशक्ती प्राप्त होते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
स्मरणशक्ती तीव्र करण्यासाठी या गणेशमंत्राचा करा जप
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement