advertisement

तुम्हालाही नर्मदा परिक्रमा करायची आहे? आधी ही माहिती जाणून घेणे महत्त्वाचे, काय आहे नियम?

Last Updated:

narmada parikrama - नर्मदा माता एक एकमेव नदी आहे, जिची पूर्ण परिक्रमा होते. कार्तिकी एकादशीपासून नर्मदा परिक्रमेला सुरुवात होते. 8 महिने ही परिक्रमा चालते. दरवर्षी लाखो भाविक श्रद्धेने नर्मदा परिक्रमा करतात. मात्र, नर्मदा परिक्रमा करण्यासाठी काही नियम महत्त्वाचे आहेत.

नर्मदा परिक्रमा नियमावली
नर्मदा परिक्रमा नियमावली
दीपक पांडे, प्रतिनिधी
खरगोन - मध्यप्रदेशची जीवन दायिनी म्हणून नर्मदा नदीला ओळखले जाते. मात्र, नर्मदा माता एक एकमेव नदी आहे, जिची पूर्ण परिक्रमा होते. कार्तिकी एकादशीपासून नर्मदा परिक्रमेला सुरुवात होते. 8 महिने ही परिक्रमा चालते. दरवर्षी लाखो भाविक श्रद्धेने नर्मदा परिक्रमा करतात. मात्र, नर्मदा परिक्रमा करण्यासाठी काही नियम महत्त्वाचे आहेत आणि परिक्रमा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला हे लक्षात ठेवायला हवे.
advertisement
नर्मदा नदी ही मध्यप्रदेशातील अमरकंटक येथून इतर जिल्ह्यांसह निमाडच्या खंडवा, खरगोन आणि बडवानीमार्गे गुजरातच्या सीमेत प्रवेश करतात. खरगोन जिल्ह्यातील नर्मदेच्या काठावर असलेल्या गावांमध्ये परिक्रमा करणाऱ्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून अन्नाचे दान केले जात आहे. येथे मोफत रात्री मुक्काम आणि भोजन उपलब्ध आहे.
advertisement
नर्मदा नदीची परिक्रमा करतानाच्या नियमांबाबत उत्तरप्रदेशच्या वृन्दावनधाम येथील निवासी संत जयरामदास महाराज यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते सध्या नर्मदा मातेची परिक्रमा करत आहेत. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, नर्मदा परिक्रमेचे अनेक नियम आहेत. यामध्ये संत आणि संन्यांसाठी वेगळे तर सामान्य लोकांसाठी वेगळे नियम आहेत. मात्र, यामध्ये काही नियम असे आहेत, ज्याचे सर्वांना पालन करावे लागते.
advertisement
नर्मदा पुराण आणि नर्मदा प्रदक्षिणा यामध्ये या नियमांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तर संकल्प पूजनावेळी व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार नियम घेतो.
नर्मदा परिक्रमासाठी नियमावली पुढीलप्रमाणे -
1. जेथून परिक्रमा सुरू होते त्याचठिकाणी संपते. मात्र, परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला जल अर्पण करणे बंधनकारक आहे.
2. कोणत्याही परिस्थितीत नर्मदा नदीला ओलांडता येत नाही.
advertisement
3. नर्मदा परिक्रमा ही नेहमी दिवसा केली जाते. सूर्यास्तानंतर परिक्रमा केली जात नाही.
4. संकल्प पूजनावेळी घेतलेल्या नियमांचे कडक पालन केले जाते.
5. सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी स्नान, पूजा आणि आरती करावी.
6. परिक्रमेदरम्यान कोणाकडूनही साहित्य मागितले जात नाही. जे मिळेल ते घेऊन काम केले जाते.
7. परिक्रमेदरम्यान नेहमी सात्विक अन्नाचे सेवन करावे आणि जमिनीवर झोपावे.
advertisement
8. परिक्रमा नेहमी नर्मदा नदीच्या डाव्या तीरापासून सुरू होते.
9. परिक्रमा करणारे फक्त नर्मदा काठ, आश्रम, मंदिरे किंवा धर्मशाळांमध्ये राहू शकतात.
10. साधू, संतांना यांना तीन चातुर्मास पाळावे लागतात.
11. पायी चालत नर्मदेची प्रदक्षिणा 3 वर्षे 3 महिने 13 दिवसांत पूर्ण होते.
सूचना : ही माहिती राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी केलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल-18 कोणताही दावा करत नाही.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
तुम्हालाही नर्मदा परिक्रमा करायची आहे? आधी ही माहिती जाणून घेणे महत्त्वाचे, काय आहे नियम?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement