हे आहे जगातील पहिलं शिवलिंग, स्वत: भगवान शंकर अन् माता पार्वतीने केली होती स्थापना

Last Updated:

प्राचीन काळी हा परिसर दारूकावन होता. एका कथेनुसार शिव आणि पार्वती प्रवास करत असताना दारूकावनात आले. येथे ब्राह्मण ऋषी तपश्चर्या करीत होते. पार्वतीने त्यांची तपश्चर्या मोडण्यासाठी भगवान शंकरांकडे आग्रह धरला आहे.

जगातील पहिले शिवलिंग
जगातील पहिले शिवलिंग
दीपक पाण्डेय, प्रतिनिधी
खरगोन : देशात 12 ज्योतिर्लिंग सह देशातील अनेक ठिकाणी कोट्यवधी शिवालय आहेत. प्रत्येक मंदिराचे एक विशेष महत्त्व आहे. असेच एक मंदिर मध्यप्रदेशातील खरगोन पासून 50 किमी दूर नर्मदा माता नदीच्या किनाऱ्यावर विद्वान पंडित मंडन मिश्र यांच्या पवित्र नगरी मंडलेश्वरमध्ये आहेत. अशी मान्यता आहे की, याठिकाणी स्थापन केलेले शिवलिंग हे जगातील पहिले शिवलिंग आहे. तसेच या शिवलिंगाची स्थापना स्वत: भगवान शंकर आणि माता पार्वतीने केली होती.
advertisement
सध्या हे मंदिर श्री गुप्तेश्वर महादेव मंदिराच्या नावाने प्रसिद्ध आहे. सरकारने 2010 मध्ये या जागेला पवित्र स्थळ घोषित केले होते. आदि गुरू शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यादरम्यान झालेल्या संवादादरम्यान, या मंदिराच्या गुहेत शंकराचार्य यांचे स्थूल शरीर सहा महिने सुरक्षित ठेवण्यात आले होते. नर्मदा पुराण, दिग्विजय शंकर ग्रंथ, रेवा खंड, भागवत गीता सह अनेक ग्रथांमध्ये या मंदिराचे वर्णन आढळते. नर्मदा परिक्रमा मार्गावर मंदिराची स्थापना झाल्यामुळे पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात.
advertisement
मंदिराचे पुजारी परमानंद केवट यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, प्राचीन काळी हा परिसर दारूकावन होता. एका कथेनुसार शिव आणि पार्वती प्रवास करत असताना दारूकावनात आले. येथे ब्राह्मण ऋषी तपश्चर्या करीत होते. पार्वतीने त्यांची तपश्चर्या मोडण्यासाठी भगवान शंकरांकडे आग्रह धरला आहे. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी भोलेनाथ बालस्वरूपात नग्न नाचू लागले. हे पाहून वनात उपस्थित असलेल्या ऋषींच्या सुंदर पत्नी प्रभावित होऊ लागल्या. ऋषींच्या लक्षात आल्यावर त्यांनी डोळे उघडले. बालकाला नग्न होऊन नृत्य करताना पाहिल्यावर त्यांना आवडले नाही आणि त्यामुळे त्यांनी याठिकाणीच त्याचे लिंग तिथे पडण्याचा शाप दिला.
advertisement
अशी झाली पहिल्या शिवलिंगाची स्थापना -
ऋषींनी दिलेल्या शापानंतर लिंग तिथे पडले. हे पाहून ब्रह्मा, विष्णु प्रगट झाले. ऋषिंना त्यांनी सांगितले की, हे भोलेनाथ आहेत. तेव्हा ऋषींनी शापातून मुक्त होण्यासाठी आणि लिंग वापस मिळवण्याचा उपाय सांगितला. नर्मदामधून एक दगड आणून याठिकाणी स्थापित करा आणि यामध्येच विराजित व्हा. स्त्रिया जेव्हा पूजा करतील तेव्हा त्यांना हे लिंग प्राप्त होईल. यानंतर सांगितल्याप्रमाणे, शिव-पार्वतीने येथे नर्मदेच्या दगडाची स्थापना केली. यानंतर त्याला नंतर शिवलिंग म्हटले गेले.
advertisement
रात्री येतो हा आवाज -
महिलांनी पहिल्यांदा याठिकाणी शंकराची पूजा केली. मंदिरात नंदी नाही. पार्वतीच्या जागी नर्मदा मातेची मूर्ती आहे, जी दुसऱ्या शिवालयात नाही. कुंड आहे, जे नेहमी नर्मदा मातेच्या पाण्याने भरलेले राहते. याच पाण्याने अभिषेक केला जातो. रात्रीच्या वेळी याठिकाणी कुणी असल्याचा भास होतो. सकाळी 4 वाजता घंटा आणि आरत्यांचा आवाज कानावर पडतो.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
हे आहे जगातील पहिलं शिवलिंग, स्वत: भगवान शंकर अन् माता पार्वतीने केली होती स्थापना
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement