तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात नवा धर्म कोणता? 4 वर्षांपूर्वीच झालीये स्थापना
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
तुम्हाला माहिती आहे का? जगातील सर्वात नवा धर्म कोणता आहे, आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
Newest Religion Of World : तुम्हाला माहिती आहे का? जगातील सर्वात नवा धर्म कोणता आहे, मुस्लिम, यहूदी, शिख की अन्य? तर यातील कोणताही नाही. तर जगातील सर्वात नवा धर्म हा अब्राहमी आहे. याचा काही ठिकाणी उच्चार इब्राहमी असा देखील करतात. हा धर्म 2020 मध्ये अस्तित्वात आला. या धर्माला माणणारे लोक एकेश्वरवादावर विश्वास ठेवतात, आणि इब्राहीम यांना ईश्वराचा दूत मानतात.
हा धर्म जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा मुस्लिम राष्ट्रांमध्ये या धर्मावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मुस्लिम समाजाला संपवण्यासाठी आणि मुस्लिम देशांचे इस्रायलसोबत संबंधांना चालना देण्यासाठीच हा धर्म निर्माण केल्या गेल्याचा आरोप अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी केला होता. ही अमेरिकेची नवी चाल असल्याचं देखील अनेकांनी म्हटलं होतं.
इतर धर्मांमध्ये असतो तसा अब्राहमी धर्मामध्ये कोणताही धर्मग्रंथ किंवा कोणीही पुजारी नाहीये. या धर्माला राजकीय धर्म असंही म्हटलं जात. या धर्माला अनेक धर्मातील धर्मगुरुंकडून मोठा विरोध करण्यात आला आहे. यहुदी, मुस्लिम, ईसाई धर्माला माणत असलेले काही जण या नव्या धर्माचे अनुयायी बनले आहेत.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
Apr 21, 2024 7:54 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात नवा धर्म कोणता? 4 वर्षांपूर्वीच झालीये स्थापना










