सायबर चोरट्यांनी गंडवलं, पण पोलिसांनी वाचवलं; बारामतीतील व्यक्तीने 1.30 कोटी गमवले, पण शेवटी मोठा 'ट्विस्ट'
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १ कोटी ३० लाख रुपयांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवली
बारामती: शेअर बाजार, आयपीओ (IPO) आणि ट्रेडिंगमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १ कोटी ३० लाख रुपयांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवली. अखेर विविध बँक खात्यांमधील सुमारे ४४ लाख रुपये गोठवले असून, दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.
अशी झाली फसवणूक
फिर्यादीला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून सायबर चोरट्यांनी प्रथम त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एका बनावट ट्रेडिंग अॅपद्वारे खाते उघडण्यास सांगून, त्यात फेक नफा दाखवण्यात आला. हा नफा पाहून फिर्यादीने वेळोवेळी मोठी रक्कम आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये जमा केली. मात्र, जेव्हा ही रक्कम काढण्याची वेळ आली, तेव्हा फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
advertisement
पोलिसांचा तांत्रिक तपास
तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, ही रक्कम प्रथम मध्यस्थ खात्यांमध्ये जमा केली जायची आणि त्यानंतर ती एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन (CDM) आणि स्वाइप मशीनद्वारे इतर खात्यांत वर्ग केली जायची. पोलिसांनी मनी ट्रेल, डिजिटल पुरावे आणि एटीएम फुटेजचा आधार घेत या संघटित रॅकेटचा शोध लावला. दोन आरोपींच्या अटकेनंतर या प्रकरणाचे धागेदोरे मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
advertisement
अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांनी मुख्य सूत्रधारांच्या सांगण्यावरून पैसे काढून ते विविध खात्यांत वळवल्याची कबुली दिली आहे. बारामती शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथके तयार केली असून, उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 1:51 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
सायबर चोरट्यांनी गंडवलं, पण पोलिसांनी वाचवलं; बारामतीतील व्यक्तीने 1.30 कोटी गमवले, पण शेवटी मोठा 'ट्विस्ट'








