Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस! अशी करावी कूष्मांडा देवीची पूजा, विधि, मुहूर्त, महत्त्व
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shardiya Navratri 2024 4th Day: चौथ्या दिवशी आपण दुर्गेचे चौथे रूप कुष्मांडा देवीची पूजा करतो. तिला चौथी नवदुर्गा म्हणतात. 8 हात असलेली कुष्मांडा माता सिंहावर स्वार होते. हातात गदा, चक्र, धनुष्य, बाण, जपमाळ, अमृत पात्र आणि कमळाचे फूल आहे.
मुंबई : शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. चौथ्या दिवशी आपण दुर्गेचे चौथे रूप कुष्मांडा देवीची पूजा करतो. तिला चौथी नवदुर्गा म्हणतात. 8 हात असलेली कुष्मांडा माता सिंहावर स्वार होते. हातात गदा, चक्र, धनुष्य, बाण, जपमाळ, अमृत पात्र आणि कमळाचे फूल आहे. ही देवी धैर्य आणि अद्भुत शक्तीचे प्रतीक मानली जाते. हे संपूर्ण विश्व निर्माण करण्याची क्षमता तिच्यात आहे. पुरी येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांच्या मते, कुष्मांडा अर्थ भोपळा असा होतो. त्यात अनेक बिया असतात, त्यामध्ये नवीन वनस्पती तयार करण्याची शक्ती असते. कुष्मांडा ही सृष्टीची देवता मानली जाते. कुष्मांडाची पूजा पद्धत, मंत्र, नैवेद्य, शुभ मुहूर्त आणि महत्त्व याविषयी जाणून घेऊया.
शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस 2024 -
द्रिक पंचांगाच्या आधारावर, अश्विन शुक्ल चतुर्थी तिथी 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 07:49 पासून सुरू होत आहे आणि ती 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 09:47 पर्यंत सुरू राहील.
देवी कुष्मांडा पूजा मंत्र -
1. ऐं ह्री देव्यै नम:
2. या देवी सर्वभूतेषु मां कूष्माण्डा रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
advertisement
3. सुरासम्पूर्ण कलशं रुधिराप्लुतमेव च। दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे॥
कुष्मांडासाठी नैवेद्य -
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेला दही, हलवा असे पदार्थ अर्पण करणे चांगले मानले जाते. याशिवाय देवीला पांढरा भोपळा वाहण्याची परंपरा आहे.
कुष्मांडा देवीच्या पूजेची पद्धत -
ब्रह्म मुहूर्तावर कुष्मांडा देवीची पूजा करणं शुभ मानलं जाते. सर्वप्रथम कुष्मांडा मातेला गंगाजलाने अभिषेक करावा. नंतर त्यांना लाल जास्वंद, गुलाब इत्यादी फुले अर्पण करा. त्यांना अक्षत, सिंदूर, फळे, धूप, दिवा, सुगंध, नैवेद्य, श्रृंगाराचे साहित्य इत्यादी अर्पण करा. या दरम्यान मंत्राचा जप करावा. त्यानंतर कुष्मांडा मातेला दही, हलवा आणि इतर मिठाई अर्पण करा. यानंतर दुर्गा चालिसा, दुर्गा सप्तशती पाठ करा. माँ दुर्गा आणि देवी कुष्मांडा यांच्या आरतीने पूजेची सांगता करा.
advertisement
कुष्मांडा देवीच्या पूजेचे फायदे
1. कुष्मांडाची पूजा केल्याने व्यक्तीला आरोग्याचे वरदान मिळते. त्याला रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते.
2. कीर्ती आणि वैभव हवे असेल तर कुष्मांडा देवीची पूजा करावी.
3. संकटात सापडलेल्या लोकांनी कुष्मांडा देवीचीही पूजा करावी. या देवीच्या कृपेने जीवनातील संकटे दूर होऊ शकतात.
4. माता कुष्मांडाच्या कृपेने माणसाला शक्ती आणि दीर्घायुष्य प्राप्त होते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 06, 2024 9:33 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस! अशी करावी कूष्मांडा देवीची पूजा, विधि, मुहूर्त, महत्त्व







