1, 11, 21 की 108, महाशिवरात्रीला शिवलिंगावर किती बेलपत्र अर्पण करणं असत शुभ?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
महाशिवरात्री हा भगवान शंकराच्या भक्तीचा सर्वात मोठा सोहळा आहे. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध वस्तू अर्पण करतात, परंतु 'बेलपत्रा'शिवाय शिवाची पूजा अपूर्ण मानली जाते.
Mahashivratri 2026 : महाशिवरात्री हा भगवान शंकराच्या भक्तीचा सर्वात मोठा सोहळा आहे. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध वस्तू अर्पण करतात, परंतु 'बेलपत्रा'शिवाय शिवाची पूजा अपूर्ण मानली जाते. बेलपत्र हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे, कारण त्यातील तीन पाने सत्त्व, रज आणि तम या गुणांचे तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानली जातात. अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, शिवलिंगावर नेमकी किती बेलपत्रे अर्पण करणे शुभ असते?
किमान 1 बेलपत्र: श्रद्धेचे प्रतीक
जर तुमच्याकडे जास्त बेलपत्रे उपलब्ध नसतील, तर तुम्ही केवळ 1 बेलपत्र पूर्ण श्रद्धेने अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात. शास्त्र सांगते की, "त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधम्", म्हणजेच एकच त्रिदल बेलपत्र अर्पण केल्याने तीन जन्मांची पापे नष्ट होतात. मात्र, हे बेलपत्र कुठेही फाटलेले किंवा कीड लागलेले नसावे.
advertisement
11 किंवा 21 बेलपत्रे: संकल्पपूर्तीसाठी
जर तुम्ही एखाद्या विशिष्ट इच्छेसाठी किंवा संकल्पासाठी महाशिवरात्रीचे व्रत करत असाल, तर 11 किंवा 21 बेलपत्रे अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. 11 ही संख्या अकरा रुद्रांचे प्रतीक आहे, तर 21 ही संख्या समृद्धीचे प्रतीक मानली जाते. प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा उच्चार करावा.
advertisement
51 किंवा 108 बेलपत्रे: सिद्धी आणि मोक्षासाठी
महाशिवरात्रीच्या महानिशीथ काळात 108 बेलपत्रे अर्पण करण्याचा विशेष महिमा आहे. 108 ही संख्या हिंदू धर्मात पूर्णतेचे प्रतीक मानली जाते. 108 बेलपत्रे अर्पण केल्याने भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि त्याला मोक्षप्राप्ती होते, असे शिवपुराणात नमूद केले आहे.
बेलपत्र अर्पण करण्याचे 'शास्त्रीय नियम'
शिवलिंगावर बेलपत्र वाहताना केवळ संख्या महत्त्वाची नाही, तर पद्धतही महत्त्वाची आहे. बेलपत्राचा गुळगुळीत किंवा शिरा नसलेला भाग नेहमी शिवलिंगाला स्पर्श करेल अशा पद्धतीने अर्पण करावा. बेलपत्र कधीही फाटलेले, छिद्र असलेले किंवा देठ तुटलेले नसावे. तीनही पाने एकत्र जोडलेली असणे अनिवार्य आहे.
advertisement
बेलपत्राच्या फांदीचा जो जाड भाग असतो, तो काढून टाकून मगच पान अर्पण करावे. बेलपत्राच्या मधल्या पानावर चंदनाने 'ओम' किंवा राम नाव लिहून अर्पण केल्यास त्याचे फळ अनंत पटीने वाढते. बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी आणि नंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. शास्त्रांनुसार बेलपत्र कधीही शिळे होत नाही. जर तुम्हाला नवीन बेलपत्र मिळाले नाही, तर शिवलिंगावर आधीच अर्पण केलेले बेलपत्र धुवून तुम्ही पुन्हा अर्पण करू शकता.
advertisement
बेलपत्राचे महत्त्व का आहे?
असे मानले जाते की बेलवृक्षाच्या मुळाशी प्रत्यक्ष महादेव निवास करतात. बेलपत्राच्या शीतल गुणधर्मामुळे शिवलिंगाची उष्णता शांत होते. जो भक्त महाशिवरात्रीला मनोभावे बेलपत्र वाहतो, त्याच्या घरी लक्ष्मीचा कायमचा वास राहतो आणि त्याला आरोग्यसंपन्न आयुष्य लाभते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 5:32 PM IST









