स्वत:च्याच पैशांसाठी मागावी लागतेय भीक? आता असं नाही होणार, 'गुरू' मिळवून देईल पैसे

Last Updated:

अत्यंत शुभ मानला जाणारा गुरू ग्रह सध्या मेष राशीत आहे. अनेक राशींच्या व्यक्तींसाठी गुरूचा हा राशीप्रवेश शुभ ठरणार आहे.

1 महिना गुरू मेष राशीतच असणार आहे.
1 महिना गुरू मेष राशीतच असणार आहे.
परमजीत कुमार, प्रतिनिधी
देवघर : ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह आपल्या एका ठराविक वेळेनंतर राशीप्रवेश करतात. त्यापैकी काही राशीप्रवेश शुभ मानले जातात तर काही अशुभ ठरतात. त्यामुळे एखादा ग्रह एखाद्या राशीत गेल्यानंतर काही राशींच्या व्यक्तींना सुखच सुख मिळतं, तर काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात अडचणींमागून अडचणी येतात.
अत्यंत शुभ मानला जाणारा गुरू ग्रह सध्या मेष राशीत आहे. अनेक राशींच्या व्यक्तींसाठी गुरूचा हा राशीप्रवेश शुभ ठरणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींचं नशीब अचानक पालटेल. झारखंडच्या देवघरचे ज्योतिषी आचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 महिना गुरू मेष राशीतच असणार आहे. त्याची दृष्टी तीन राशींवर पडेल आणि त्यांचं भाग्य उजळेल. या राशी आहेत सिंह, तूळ आणि मेष.
advertisement
मेष : आपल्या धनसंपत्तीत वाढ होईल. आपल्याला समाजात मान-सन्मान मिळेल. पैसे कोणाला उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. कामानिमित्त प्रवास होईल. हा प्रवास लाभदायी ठरेल. परदेशी प्रवासाचा विचार करत असाल तर त्यासाठीही अनुकूल काळ आहे.
advertisement
सिंह : आपण रोजगाराच्या शोधात असाल, तर आता आपल्याला उत्पन्नाची चांगली संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात लागेल. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळेल. व्यवसायातून चांगला नफा मिळेल. वडील आणि मित्रमंडळींच्या साथीने थांबलेली कामं पूर्ण होतील. नातेसंबंध सुधारतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील.
advertisement
तूळ : आपल्यासाठी 1 मेपर्यंतचा कालावधी अत्यंत चांगला आहे. नशिबाच्या साथीने हाती घ्याल त्या कार्यात यश मिळेल. उत्पन्नात मनासारखी वाढ होईल. वाहन किंवा जमीन खरेदी करायची असेल तर ही वेळ अनुकूल आहे. मुलांबाबत शुभवार्ता कळतील. जोडीदारासोबत चांगला प्रवास होईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या/अध्यात्म/
स्वत:च्याच पैशांसाठी मागावी लागतेय भीक? आता असं नाही होणार, 'गुरू' मिळवून देईल पैसे
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement