फेब्रुवारीत तुमचंही पालटू शकतं नशीब, कदाचित होऊ शकतो भाग्योदय! यात तुमची रास आहे का पाहा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषी पंकज पाठक यांनी सांगितलंय की, फेब्रुवारी महिना काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत संघर्षाचा असणार आहे. तर काही राशींसाठी हा महिना सुखद असेल. त्यामुळे पाहूया या महिन्यात नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना मिळेल सुख.
तूळ : आपल्यासाठी संपूर्ण फेब्रुवारी अनुकूल आहे. आरोग्यासंबंधित लहान-मोठी दुखणी उद्भवतील, मात्र इतर सर्व बाबतीत महिन्याची सुरूवातच अत्यंत शुभ होईल. करियरमध्ये यश मिळेल. गुंतवणूक केल्यास त्यातून चांगला नफा मिळेल. नोकरीत यशस्वी व्हाल. घर, जमिनीबाबत काही वाद असतील तर ते मिटतील. वडिलोपार्जित संपत्तीबाबतच्या सर्व अडचणी दूर होतील. महिन्याच्या मध्यात करियरबाबत शुभवार्ता कळतील. केवळ आपल्या वेळापत्रकाकडे आणि आहाराकडे लक्ष द्या, नाहीतर पोटासंबंधित विकार जडू शकतात.
advertisement
वृश्चिक : आपल्याला जरा सतर्कतेने काम करायचंय. खूप विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कोणाच्याही बोलण्यात येऊ नये. आपल्या कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कदाचित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. महिन्याच्या मध्यात कुटुंबियांसंबंधित अडचणी निर्माण होतील. भावंडांशी वाद होऊ शकतो. प्रेमप्रकरणात जरा जपून. पालकांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. महिन्याच्या उत्तरार्धात मात्र सारंकाही तुमच्या मनासारखं घडेल. करियरसाठी हा अत्यंत अनुकूल कालावधी असेल.
advertisement
धनू : आपल्यासाठी हा महिना चढ-उताराचा असेल. महिन्याच्या सुरूवातीपासून बचतीकडे लक्ष द्या, त्याचा फायदा होईल. नोकरीत सिनिअर आणि ज्युनिअर दोघांपासूनही जरा सांभाळून राहा. गप्पा-गप्पांमध्ये असं काही बोलू नका ज्याचा तुम्हाला पुढे त्रास होईल. गुंतवणूकीत अडकलेले पैसे मिळवणं कठीण होईल. स्पर्धक वाढतील. महिन्याच्या उत्तरार्धात मात्र संपूर्ण परिस्थिती आपल्या मनासारखी होईल.
advertisement
मकर : कोणत्याही गोष्टीत अती करू नये. त्यामुळे तुमचे नातेसंबंध बिघडू शकतात. महिन्याची सुरूवातच कौटुंबिक वादाने होईल. त्यामुळे शब्दांवर ताबा ठेवा. तुमच्याकडून वादाची सुरूवात होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या पार्टनरच्या भावना जपा. महिन्याच्या मध्यात आपल्याला प्रचंड लाभ होणार आहे. त्यामुळे सुरूवातीला सावध राहा. त्यानंतर नफाच नफा होईल. व्यवसायात यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीबाबत सर्व अडचणी दूर होतील. महिन्याच्या उत्तरार्धात आपला मान-सन्मान वाढेल.
advertisement
कुंभ : महिन्याच्या सुरूवातीला घरात आणि घराबाहेर दोन्ही ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. नोकरीत वेळेत टार्गेट पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या आठवड्यात खर्च वाढेल. ज्यामुळे तुमचं आर्थिक गणित बिघडू शकतं. महिन्याच्या मध्यात वेळ, आरोग्य आणि नातेसंबंध या कोणत्याच बाबतीत लाभ होणार नाही. महिनाभर वाहन जपून चालवा. महिन्याच्या शेवटी मात्र आनंदवार्ता मिळणार आहे.
advertisement
मीन : आपल्यासाठी हा महिना प्रचंड आनंद आणि मोठमोठ्या संधी घेऊन येणार आहे. बऱ्याच काळापासून रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना या काळात नोकरी मिळेल. सुरूवातीला प्रत्येक कामात अडचणी येतील. मात्र पहिल्याच आठवड्यात अचानक लाभ होईल. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याच्या मध्यात शुभवार्ता मिळेल. करियरसाठी हा कालावधी अत्यंत अनुकूल आहे. उत्पन्नाचे अधिक स्त्रोत निर्माण होतील. मित्रांसोबत दूरचा प्रवास होऊ शकतो.
advertisement