Pune: माजी जि. प. अध्यक्षाच्या वाढदिवसाला DJ बोलवला, अचानक ब्रेक फेल, पाच जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू

Last Updated:

Junnar DJ Accident: गाडीने चिरडलेल्या तरुणांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले. मात्र या दुर्दैवी घटनेत आदित्य सुरेश काळे (वय २१) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

जुन्नरमध्ये डीजेचा अपघात
जुन्नरमध्ये डीजेचा अपघात
सचिन तोडकर, प्रतिनिधी, जुन्नर : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान डीजेच्या गाडीचा ब्रेक फेल होऊन ढोल ताशा पथकातील चार ते पाच जणांना गाडीने चिरडले असून त्यात एकाचा मृत्यू झालाय तर इतर जखमींना प्रकृती गंभीर आहे.
जुन्नर तालुक्यातील आदिवासी नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीला ढोल ताशा पथकासह डीजेही लावण्यात आला होता. मिरवणूक सुरू झाल्यानंतर काही वेळातच डीजेच्या गाडीचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडीने जवळच असणाऱ्या ढोल ताशा पथकातील चार ते पाच तरुणांना चिरडले. त्यानंतर ही गाडी एका इमारतीच्या संरक्षक भिंतीला जाऊन धडकली.
advertisement
गाडीने चिरडलेल्या तरुणांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले. मात्र या दुर्दैवी घटनेत आदित्य सुरेश काळे (वय २१) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून इतरांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जुन्नर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डीजेच्या गाडीचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असून मुळातच डीजेवर बंदी असतानाही वाढदिवसाच्या मिरवणुकीत डीजे वापरलाच कसा? असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जातोय.
advertisement

कोण आहेत देवराम लांडे?

देवराम लांडे हे उत्तर पुणे जिल्ह्यातील आदिवासी चेहरा
पुणे जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष राहिले आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते नेते आहेत
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune: माजी जि. प. अध्यक्षाच्या वाढदिवसाला DJ बोलवला, अचानक ब्रेक फेल, पाच जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement